IND vs ENG, Day 4 Highlights : भारतीय संघ आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात सुरु असलेल्या कसोटी सामन्यातील शेवटचा डाव आता सुरु झाला आहे. भारताने दुसऱ्या डावात 284 धावा उभारत इंग्लंडसमोर विजयासाठी 378 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारताकडून दुसऱ्या डावात केवळ पंत आणि पुजाराने चांगली झुंज दिली. पंतने 57 तर पुजाराने 66 धावांची झुंज दिल्याने भारताने हे 378 धावांचे आव्हान इंग्लंडला दिले आहे.



सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंडने गोलंदाजी घेतली. ज्यानंतर भारतीय संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली पण निम्मा संघ बाद झाला असताना ऋषभ पंतने 146 आणि रवींद्र जाडेजाने 104 धावा केल्यामुळे भारताने 416 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. ज्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली, पण जॉनी बेअरस्टो (104) याचं शतक संघासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरलं. पण, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लंडचा संघ 61.1 षटकांत 284 धावांत संपुष्टात आला. पहिल्या डावात भारताने 132 धावांची आघाडी घेतली. ज्यानंतर दुसरा डाव खेळायला आलेल्या भारताच्या फलंदाजांना खास कामगिरी करता आली नाही. सर्वत फलंदाज स्वस्तात माघारी परतले. पण पुजारा आणि पंत यांची अर्धशतकं संघासाठी महत्त्वाच्या ठरली. यावेळी पंतने (Rishabh Pant) 86 चेंडूत 57 तर पुजाराने (Cheteshwar Pujara) 168 चेंडूत 66 धावा केल्यामुळेच भारत 245 धावा करु शकला. ज्यामुळे आता इंग्लंडसमोर 378 धावांचे एक तगडे लक्ष्य भारताने ठेवले आहे.  


हे देखील वाचा-