(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सलग दुसऱ्या दिवशी करोडोंची ऑर्डर, दोन वर्षांत तब्बल 796 टक्के रिटर्न्स, डिफेन्स सेक्टरचा 'हा' मल्टिबॅगर स्टॉक म्हणजे पैशांचा पाऊस!
शेअर बाजारावर सूचिबद्ध झालेल्या अशा अनेक कंपन्या आहेत, ज्या आपल्या गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स देत आहेत. मल्टिबॅगर ठरलेल्या अशाच एका कंपनीची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे.
Defence stocks : गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या क्षेत्रातील कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स देताना दिसतायत. संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या Avantel Ltd या कंपनीनेही गेल्या दोन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांचे खिशे पैशाने भरून टाकले आहेत. दोन वर्षांत ही कंपनी मल्टिबॅगर स्टॉक म्हणून समोर आली आहे. दरम्यान, या कंपनीला दोन दिवसांत सलग दोन ऑर्डस मिळाल्या आहेत. त्यामुळे आता या स्टॉकवर गुंतवणूकदाराच्या नजरा खिळल्या आहेत. भविष्यात या कंपनीची कामगिरी कशी असणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
शुक्रवारी मिळाली 44.49 कोटींची ऑर्डर
संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या अव्हॅन्टेल लिमिटेड या कंपनीला नव्या कामाच्या सलग दोन ऑर्डर्स मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही कोट्यवधी रुपयांच्या ऑर्डर्स आहेत. मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी (27 सप्टेंबर) लार्सन अँड टुब्रो (L&T) या दिग्गज कंपनीकडून अव्हॅन्टेल लिमिटेड या कंपनीला तब्बल 44.49 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. नवी ऑर्डर मिळूनदेखील शुक्रवारी मात्र हा शेअर चांगली कामगिरी करू शकला नाही. शुक्रवारी बाजार बंद झाला तेव्हा हा शेअर 0.64 टक्क्यांनी घसरला होता. शुक्रवारी या शेअरचे मूल्य 171.60 रुपये होते. हा एक मल्टिबॅगर डिफेन्स स्टॉक (Defence Stocks) आहे. दोन वर्षांत या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 796 टक्क्यांनी मल्टिबॅगर रिटर्न्स दिले आहेत.
भारत इलेक्ट्रॉनिक्सकडून मिळाली ऑर्डर
अव्हॅन्टेल लिमिटेड या कंपनीला 27 ऑक्टोबर रोजी मिळालेल्या एल अँड टीच्या ऑर्डरला मार्च 2025 पर्यंत पूर्ण करायचे आहे. या ऑर्डरअंतर्गत ही कंपनी एल अँड टी या कंपनीला सॅटकॉम सिस्टिमचा (Satcom Systems) पुरवठा करणार आहेत. याआधी या कंपनीला 26 सप्टेंबर रोजी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) या दिग्गज कंपनीकडून 3.45 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. कंपनीला ही ऑर्डर जुलै 2025 पर्यंत पूर्ण करायचे आहे.
तीन वर्षांत 1220 टक्क्यांनी जबरदस्त रिटर्न्स
अव्हॅन्टेल लिमिटेड या कंपनीकडे भारतीय संरक्षण क्षेत्राला वेगवेगळी उत्पादने पुरवली जातात. ही कंपनी रेडिओ कम्पोनन्ट्स, सॅटेलाइट कम्यूनिकेशन्स, HF कम्यूनिकेशन्स, इलेक्ट्रॉनिक वारफेयर आणि रडार सिस्टिमला पुरक ठरणारी अत्पादनं पुरवते. गेल्या सहा महिन्यांत या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 73 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत. या वर्षांत हा शेअर 46 टक्क्यांनी वाढला आहे. एका वर्षात हा शेअर 127 टक्क्यांनी वाढला आहे. तर गेल्या दोन वर्षांत या शेअरने 796 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत. तीन वर्षांत या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 1220 टक्क्यांनी जबरदस्त रिटर्न्स दिले आहेत.
हेही वाचा :