Sandeep Deshpande : तुमची कंपनीच गुजराती असेल तर बोऱ्याबिस्तारा गुंडाळा; मनसेचा अंबानींवर हल्लाबोल
Mumbai : मनसेकडून जोरदार प्रत्युत्त देण्यात आलंय. "तुमची कंपनीच गुजराती असेल तर बोऱ्याबिस्तारा गुंडाळा" असे प्रत्युत्तर मनसे (MNS) नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी दिले आहे.
Mumbai : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती (Rich) आणि भारतातील आघाडीचे उद्योगपती (Bussiness) यांनी गुजरातला मातृभूमी आणि कर्मभूमी म्हटलं आहे. रिलायन्स (Reliance) ही गुजराती कंपनी होती, आहे आणि कायम राहील, असे वक्तव्य मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी केलं होते. त्याला मनसेकडून जोरदार प्रत्युत्त देण्यात आलंय. "तुमची कंपनीच गुजराती असेल तर बोऱ्याबिस्तारा गुंडाळा" असे प्रत्युत्तर मनसे (MNS) नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी दिले आहे.
तुम्ही महाराष्ट्रात आलाच कशाला?
संदीप देशपांडे (Sandip Deshpande) म्हणाले, रिलायन्स ही एक भारतीय कंपनी आहे, असं आम्हाला वाटतं होतं. पण अंबानी यांनी कालच स्पष्ट सांगून टाकलं की रिलायन्स एक गुजराती कंपनी आहे. तुमची कंपनी गुजराती होती तर तुम्ही महाराष्ट्रात आलाच कशाला? जमिनी पण महाराष्ट्रातल्या वापरल्या मराठी माणसाने जमिनी दिल्या, त्याचाच उपयोग करत उद्योग करता आहात ना? असा सवाल देशपांडे यांनी उपस्थित केलाय.
फक्त गुजरातीच असाल तर मग महाराष्ट्रात तुमचं काम काय?
जर तुमचा आणि महाराष्ट्राचा संबंधच नसेल तर अँटिलियाचा गाशा गुंडाळा आणि गुजरातला जा, असा इशारा देशपांडे यांनी दिलाय. इथून पुढे मराठी माणसाने हे लक्षात ठेवायला पाहिजे की, आपण एका गुजरात कंपनीकडून वस्तू घेत आहोत, असे आवाहनही देशपांडे यांनी केले. मुकेश अंबानी यांचा उद्देशच जर गुजरातचा विकास असेल तर महाराष्ट्रात काय करता आहात? हा प्रश्न आहे, असेही देशपांडे यांनी नमूद केले.
पीएम मोदींच्या उपस्थितीत केले वक्तव्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या बाजूला उपस्थित होते तेव्हा त्यांनी हे विधान केलं. पंतप्रधान यांनी त्यांना सांगायला पाहिजे होतं तुमची कंपनी भारतीय आहे. की पंतप्रधान पण फक्त गुजरातचेच आहेत? असा सवालही देशपांडे यांनी उपस्थित केलाय. आम्ही महाराष्ट्राच्या मुद्यावर लढतो त्यामुळे तेव्हा अख्खा देश आम्हाला संकुचित बोलतो. मात्र कोण संकुचित आहे, हे स्पष्ट झाले आहे. यामध्ये मराठी माणसाचे जागरूक होणं गरजेचं आहे, असे मतही देशपाडे यांनी व्यक्त केलंय
मराठी माणसाची जमीन जाते, फायदा गुजरात्यांचा होतो
मराठी माणसाची जमिन गुजराती लोक व्यवसायासाठी खरेदी करतात. मराठी माणसाची जमिन जाते. फायदा मात्र, गुजरात्यांचा होतो. शिवाय, गुजराती माणसांकडून मराठी माणसांना रोजगारही मिळत नाही, असेही संदीप देशपांडे यांनी नमूद केले.
पाहा काय म्हणाले संदीप देशपांडे
इतर महत्वाच्या बातम्या
'सरकारच्या स्थैर्याबाबत शंका राहण्याचं कारण नाही, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंना टोला