एक्स्प्लोर

Tik Tok | टिकटॉक व्हिडिओ काढताना बंदुकीतून गोळी सुटून तरुणाचा मृत्यू

टिकटॉक व्हिडिओ बनवताना सनी पवारकडे असलेल्या बेकायदेशीर गावठी कट्ट्यातून गोळी सुटली आणि 20 वर्षीय प्रतीक वाडेकर याचा जागीच मृत्यू झाला.

शिर्डी : टिकटॉक व्हिडिओ करताना होणारे अपघात टाळण्यासाठी सुप्रीम कोर्टाने त्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. मात्र टिकटॉक पुन्हा सुरु झालं, तसं या अपघातांनाही पुन्हा निमंत्रण मिळाल्याचं दिसत आहे. टिकटॉक व्हिडीओ तयार करताना गावठी कट्टयातून गोळीबार झाल्याने एका युवकाला आपला जीव गमवावा लागला. शिर्डीच्या भरवस्तीत असलेल्या एका हॉटेलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. शिर्डीतील पवनधाम या हॉटेलमध्ये शिर्डीतीलच रहिवासी असलेले वाडेकर कुटुंबीय दहाव्याच्या कार्यक्रमासाठी एकत्र आले होते. दहावं संपल्यानंतर हॉटेलमधील रुम नंबर 104 मध्ये प्रतीक वाडेकर, नितीन वाडेकर, सनी पवार आणि इतर दोघे बसले होते. यावेळी टिकटॉक व्हिडिओ काढण्याचा मोह या सर्वांना आवरला नाही. Tik Tok | हातात कोयता घेऊन व्हिडीओ केल्याप्रकरणी एकाला बेड्या | पिंपरी सनी पवारकडे असलेल्या बेकायदेशीर गावठी कट्ट्याचा व्हिडीओ बनवत असताना अचानक पिस्तुल मधून गोळी सुटली आणि 20 वर्षीय प्रतीक वाडेकर याचा जागीच मृत्यू झाला. प्रतीकसोबत असणाऱ्या सर्वांनी तात्काळ घटनास्थळावरुन पोबारा केला. मात्र पोलिसांनी तपास करत या घटनेमागील सत्य बाहेर आणलं. या प्रकरणी तीन आरोपींना ताब्यात घेतलं असून पिस्तुल कुठून आलं, याबाबत तपास सुरु आहे. शिर्डी जगातील भाविकांचं श्रद्धास्थान असून रोज हजारो भाविक शिर्डीत येतात. अशावेळी गुन्हेगारीचं प्रमाणही शिर्डीत वाढत चाललं असून  गावठी कट्टे शिर्डीत येतात कसे, याचा तपास होणं गरजेचं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

श्रीराम मंदीर लुटीविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यभर रामरक्षा महाआरतीचं आयोजन, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईत महाआरती
श्रीराम मंदीर लुटीविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यभर रामरक्षा महाआरतीचं आयोजन, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईत महाआरती
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले

व्हिडीओ

Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway News : उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज, दादर-भुसावळ खान्देश एक्सप्रेस आठवड्यातून सहा दिवस धावणार, दोन थांबे वाढवले
उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज,खान्देश एक्स्प्रेस आठवड्यातून 6 दिवस धावणार
Jubilant Ingrevia Ltd : रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
Gold Silver Rate : सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
Embed widget