एक्स्प्लोर
नागपुरात मंदिरासोबत सेल्फी घेताना तरुणाचा मृत्यू
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध रामटेक गडमंदिरात एका तरुणाचा सेल्फी काढताना दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मनोज भुते असं मृत तरुणाचं नाव असून तो नागपूरच्या भगवान नगर परिसरातील रहिवाशी होता.
14 नोव्हेंबरच्या रात्री मनोज त्याच्या एका मित्रासह त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव पाहण्यासाठी रामटेकला गेला होता. उत्सव संपल्यानंतर 15 तारखेच्या पहाटे अडीच वाजता मनोज गड मंदिरावरील राम झरोका येथील बुरुजावर उभं राहून सेल्फी घेत होता. यावेळी अंधार आणि पाठीमागचा अंदाज न आल्यामुळे मनोज बुरुजावरुन खाली कोसळला.
दगडी पायऱ्यांवर कोसळल्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्याला तातडीने नागपूरच्या रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र उपचारांदरम्यान मंगळवारी त्याचा मृत्यू झाला. सध्या पोलिसांनी या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद करत तपासाला सुरुवात केली आहे.
शेकडो वर्ष जुन्या रामटेक गड मंदिरातील राम झरोकाच्या वर जाण्यास सक्त बंदी आहे. मात्र तरीही मनोज राम झरोकाच्या वर कसा पोहोचला याची चौकशीही पोलिसांनी सुरु केली आहे. रात्रीच्या अंधारात पाठीमागे असलेल्या मंदिराला सेल्फीत टिपण्याचा मोह मनोजच्या जीवावर बेतल्याची चर्चा आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement