एक्स्प्लोर
Advertisement
महाबळेश्वरमध्ये पर्यटक कर मागितल्याने शिवसेना आमदाराची मारहाण
महाबळेश्वर (सातारा) : शिवसेनेच्या आमदाराच्या गुंडगिरीची घटना साताऱ्यात घडली आहे. महाबळेश्वरमध्ये पर्यटक कर मागितल्याच्या कारणावरुन शिवसेनेचे आमदार तुकाराम काते यांनी वनसमितीच्या कार्यकर्तांना मारहाण केली.
आमदार तुकाराम काते हे महाबळेश्वरमध्ये फिरण्यासाठी आले होते. त्यांची गाडी वेण्णा लेक येथील चौकात अडवली. ते आमदार आहेत हे वनसमितीच्या कार्यकर्तांना महिती नव्हते. त्यामुळे वनसमितीच्या कार्यकर्त्यांनी इतरांप्रमाणे आमदार काते यांच्याकडेही पर्यटन कर मागितला.
पर्यटन कर मागितल्याच्या कारणावरुन आमदार काते यांनी गाडीतून उतरुन त्या युवकास मारहाण करण्यास सुरवात केली. यावेळी मोठी बाचाबाचीही झाली.
धक्कादायक म्हणजे महाबळेश्वर पोलिस ठाण्यात आमदाराविरोधातील वनसमितीच्या कार्यकर्त्यांची तक्रार नोंदवून घेण्यात आली नाही. त्याउलट, वनसमितीच्या कार्यकर्त्यांवरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्रीडा
मुंबई
Advertisement