ठाणे : तरुणांनी राजकारणात उतरु नये असं माझे स्पष्ट मत आहे. मात्र, त्यांनी गप्पही बसू नये, आपल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व्यक्त व्हावं, असं मत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांनी व्यक्त केलं. ठाण्यात आज(21 डिसेंबर)अनिल काकोडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारीत पुस्तक प्रकाश सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात माध्यमांशी बोलताना त्यांनी आपले मत व्यक्त केले.


सुप्रसिद्ध अणुशस्त्राज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारीत 'सूर्यकोटी समप्रभ द्रष्टा अणुयंत्रिक - डॉ. अनिल काकोडकर' या चरित्रग्रंथाचे प्रकाशन आज करण्यात आले. ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये हे चरित्रग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते.

देशात अनेक आंदोलनं विद्यार्थ्यांनीच केली
देशात अनेक आंदोलनं ही विद्यार्थ्यांनीच केली आहेत. त्यामुळे आत्ता होणारी विद्यार्थ्यांची आंदोलने ही अनपेक्षित नसल्याचे काकोडकर म्हणाले. पुढे ते म्हणाले, की तरुणांनी राजकारणात उतरु नये असं माझे स्पष्ट मत आहे. मात्र, त्यांनी गप्प न बसता आपल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व्यक्त झालं पाहिजे. आपण पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत खुपच मागे आहोत. नवनवीन तंत्रज्ञान आणि अणुऊर्जा निर्माण करण्याकरता लागणारी सामुग्रीची मोठ्या प्रमाणात आपल्या देशाला गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला पद्मभूषण आणि आयसीटीचे माजी संचालक डॉ. जेष्ठराज जोशी, पद्मभूषण आणि ज्येष्ठ खगोलशास्तज्ञ डॉ. शशीकुमार चित्रे, जेष्ठ वैज्ञानिक व विज्ञान कथा लेखक बाळ फोंडके आणि एनटीआरओचे माजी अध्यक्ष जेष्ठ वैज्ञानिक आल्हाद आपटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. अनिल काकोडकर यांच्या जीवनावरील चरित्रग्रंथाचे लिखाण अनिता पाटील यांनी केले आहे. तर पत्रकार चंद्रशेखर कुलकर्णी यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे.

संबंधित बातम्या :

CAA बाबत देशाचा कल : 62 टक्के लोकं म्हणतात.. सुधारित नागरिकत्व कायदा योग्यचं

शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ करणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा

शेतकरी कर्जमाफी, 10 रुपयांत शिवभोजन, मुख्यमंत्र्यांकडून शेवटच्या दिवशी घोषणांचा पाऊस

Nagpur winter session | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या 'या' दहा मोठ्या घोषणा | ABP Majha