आंदोलनकर्ते आणि सरकार करत असलेल्या दाव्यांच्या पार्श्वभूमीवर एबीपी न्यूज-सी वोटरने देशातील नागरिकांचा कल जाणून घेतला आहे. देशातल्या जवळपास तीन हजार लोकांशी 17 ते 19 डिसेंबर दरम्यान या कायद्यासंबंधी संवाद साधला. यावेळी सुधारित नागरिकत्व कायद्याचे तुम्ही समर्थन करता का? या कायद्यामुळे संविधानाचे उल्लघन होते का? असे प्रश्न विचारण्यात आले.
1. तुम्ही सुधारित नागरिकत्व कायद्याचे समर्थन करता का?
हो - 62%
नाही - 37%
सांगू शकत नाही - 1%
2. सुधारित नागरिकत्व कायद्याच्या मुद्द्यावर देश सोबत आहे का?
सरकार सोबत - 59%
विरोधकांसोबत - 32%
सांगू शकत नाही - 9%
3. सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे संविधानाचे उल्लंघन होते का?
हो - 47%
नाही - 47%
सांगू शकत नाही - 6%
4. सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन कोणी गोंधळाची परिस्थिती निर्माण केली?
विरोधी पक्ष - 29%
मीडिया - 20%
सरकार - 37%
सांगू शकत नाही - 10%
कोणीच नाही - 1%
सर्वांनी - 3%
5. नागरिकत्वाचा पुरावा न देणाऱ्याला काय शिक्षा मिळावी? (वेगवेगळे प्रश्न)
तुरुंगवास – 52%
देशातून हद्दपार - 78%
मतदानाचा हक्क काढून घ्यावा - 71%
सरकारी सुविधा बंद - 61%
6. पूर्ण देशात NRC लागू करवी का?
हो - 65%
नाही - 28%
सांगू शकत नाही - 7%
7. सुधारित नागरिकत्व कायदा मुस्लिमांच्या विरोधात आहे का?
हो - 32%
नाही - 56%
सांगू शकत नाही - 8%
सर्वांच्या विरोधात - 4%
संबंधित बातम्या :
आठ राज्यांचा नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या अंमलबजावणीला विरोध : शरद पवार
CAA Protest | परभणीत हिंसाचारप्रकरणी 50 जणांना अटक, राष्ट्रवादीच्या नगरसेवकावरही गुन्हा दाखल
CAA वर बोलणं महागात, हरियाणा सरकारने परिणीती चोप्राला ब्रॅण्ड अॅम्बेसिडर पदावरुन हटवलं
Raj Thackeray Press Conference | "बांगलादेशी, अफगाणिस्तान,पाकमधून येणाऱ्यांना हाकला"- राज ठाकरे | ABP Majha