बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गेल्या दहा वर्षांपासून पंकजा मुंडे यांच्या ताब्यात आहे. आदित्य सारडा हे या बँकेचे अध्यक्ष आहेत.
काय आहे प्रकरण?
2017 मध्ये फडणवीस सरकारने छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना या नावाने कर्जमाफी जाहीर केली, यामध्ये नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना किमान 15 अन् जास्तीत जास्त 25 हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान देण्यात आले होते. बीड जिल्हा बँकेत तब्बल 18 हजार शेतकऱ्यांना 24 कोटी 65 लाख रुपये अनुदान प्राप्त झाले होते. हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर न जमा करता बँकेने ते ठेविदारांना वाटप करुन एकप्रकारे गैरव्यवहार केला, अशी तक्रार कालिदास आपटे यांनी केली होती.
या प्रकरणी लातूर सहनिबंधक यांच्याकडे 14 महिने सुनावणी झाली, त्यानंतर सहनिबंधक यांनी बँकेचे अध्यक्ष आदित्य सारडा यांना अध्यक्ष पदावरुन आणि संचालक पदावरुन पदच्युत करण्यात आले आहे. तसेच बँकेचे सरव्यवस्थापक बी. एस. देशमुख यांना नोकरीतून बडतर्फ करण्याचा आदेश दिला आहे. दरम्यान या प्रकरणांमध्ये कोणतीही अफरातफरी झाली नाही, शेतकऱ्यांचे पैसे हे बँकेत खात्यावर जमा होते. यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेऊन पुढील पावले उचलणार असे बँकेचे बडतर्फ अध्यक्ष आदित्य सारडा यांनी सांगितले.
यापूर्वीही बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वादात -
सप्टेंबर 2018 ला राज्यभर गाजलेल्या बीड जिल्हा सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाने विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना दणका दिला. परळीतील संत जगमित्र सूतगिरणीच्या तीन कोटींच्या कर्ज वसुलीसाठी धनंजय मुंडे यांच्यासह इतर आठ जणांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. यापुढे या मालमत्तेची विक्री अथवा व्यवहार करता येणार नाही.
हेही वाचा - शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ करणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा
Beed Farmers | बीडमधील शेतकऱ्यांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून काय अपेक्षा आहेत? | बीड | ABP Majha