एक्स्प्लोर

Nashik Crime : बायकोला म्हणाला, महादेवाचं दर्शन घेऊन येतो... दर्शन तर घेतलं पण घरी परतण्याआधीच स्वत: ला संपवलं

Nashik Crime : सकाळी घरातून बाहेर पडताना पत्नीला मंदिरातून दर्शन घेऊन येतो, म्हणत घराबाहेर पडला, मात्र..

Nashik Crime : नाशिकरोड चेहडी पुलाच्या (Nashik Road) शिव मंदिराजवळ एका 30 वर्षीय तरुणाने आत्महत्या (Youth Suicide) केल्याची घटना आज सकाळी घडली. आज सकाळी घरातून बाहेर पडताना पत्नीला मंदिरातून दर्शन घेऊन येतो, म्हणत घराबाहेर पडला. पळसे-चेहेडी गावानजीक असलेल्या महादेव मंदिराजवळ जात गावठी कट्ट्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

नाशिकसह (Nashik) जिल्ह्यात अल्पवयीन मुलांपासून ते जेष्ठांपर्यंत आत्महत्येसारखे (Suicide) टोकाचे पाऊल उचलले जात आहे. रोजच पोलिसांच्या दैनंदिन अहवाल चार ते पाच नागरिकांनी जीवन संपवल्याचे समोर येत असते. अशातच नाशिक येथील एका कंपनी कामगार तरुणाने स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. संदीप नाना शहाणे असे या तीस वर्षीय तरुणाचे नाव आहे. हा तरुण चासगाव येथील असून आज सकाळी घरातून बाहेर पडताना बायकोला मंदिरातून दर्शन करून येतो म्हणत, नाशिकरोड (Nashik Road Police) परिसरातील पळसे भागातील शिव मंदिराजवळ गावठी कट्ट्याने स्वतः वर गोळी झाडून आत्महत्या केली.

संदीप हा सातपूरच्या एमआयडीसीत (Satpur MIDC) एका कंपनीत कामाला होता. वर्षभरापूर्वीच त्याचे लग्न (Marriage) झाले होते. मात्र आज सकाळी घराबाहेर पडत नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या पळसे येथील दारणा नदीजवळील भैरवनाथ मंदिराजवळ संदीप याने आत्महत्या केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे. घटनेची माहिती मिळताच नाशिकरोड पोलिस घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले. त्याचबरोबर घटनास्थळावरून गावठी कट्टा जप्त केला आहे. संदीप याने आत्महत्या का केली, याचे कारण समोर आले नसून तसेच  त्याच्याकडे गावठी कट्टा आला कुठून? हा गंभीर प्रश्न देखील पोलिसांसमोर उभा राहतो. 

कुटुंबियांना जबर धक्का 

नाशिकरोड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास नाशिक रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास वांजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत. संदीप सहाणे याने आत्महत्या का केली, याबाबतचे निश्चित कारण अद्याप समजू शकलेले नाही. तसेच कौटुंबिक वादातून त्याने आत्महत्या केली असावी अशी चर्चा परिसरात सुरू आहे. मात्र या घटनेने कुटुंबियांना धक्का बसला असून वर्षभरापूर्वीच संदीपचे लग्न झाले असल्याने अशातच त्याने आत्महत्या का केली असावी असा प्रश्नही नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: संसदेचं पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आठवडा; गृहमंत्री अमित शाह विरोधकांच्या रडारवर
Maharashtra Live News Updates: संसदेचं पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आठवडा; गृहमंत्री अमित शाह विरोधकांच्या रडारवर
Solapur Ujani Dam: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी, उजनी धरणात 70 हजार क्युसेक पाण्याची आवक, अंबाबाई बंधाऱ्याचे सर्व दरवाजे उघडले; धरण किती टक्के भरलं ?
सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी, उजनी धरणात 70 हजार क्युसेक पाण्याची आवक, अंबाबाई बंधाऱ्याचे सर्व दरवाजे उघडले; धरण किती टक्के भरलं ?
Rohit Pawar: टीईटी घोटाळ्यातील आरोपी हा भाजपशी संबंधित, तो एका नेत्याचे आर्थिक व्यवहार सांभाळतो; रोहित पवारांचा सनसनाटी दावा
टीईटी घोटाळ्यातील आरोपी हा भाजपशी संबंधित, तो एका नेत्याचे आर्थिक व्यवहार सांभाळतो; रोहित पवारांचा सनसनाटी दावा
Sanjay Raut On E20 Janta Party: कॉकरोच जनता पार्टीनंतर आता E 20 पार्टीची स्थापना; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
कॉकरोच जनता पार्टीनंतर आता E 20 पार्टीची स्थापना; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut On E20 Janta Party: कॉकरोच जनता पार्टीनंतर आता E 20 पार्टीची स्थापना; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
कॉकरोच जनता पार्टीनंतर आता E 20 पार्टीची स्थापना; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Devendra Fadnavis and Sanjay Raut: देवेंद्र फडणवीस कितीही नाही म्हणाले तरी मोदी-शाहांचा आदेश आल्यावर त्यांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल: संजय राऊत
देवेंद्र फडणवीस 100 टक्के दिल्लीत जाणार, मोदी-शाहांचा आदेश आल्यावर त्यांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल: संजय राऊत
पोरांपोरींना रस्त्यावर पाडून सोलून काढल्यानंतर दिल्ली पोलिस आता पीएम मोदींविरोधातील पोस्ट, व्हिडिओ आणि कमेंट्स काढून टाकण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस पाठवणार
पोरांपोरींना रस्त्यावर पाडून सोलून काढल्यानंतर दिल्ली पोलिस आता पीएम मोदींविरोधातील पोस्ट, व्हिडिओ आणि कमेंट्स काढून टाकण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस पाठवणार
High Court: मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
E20 Janta Party: E20 जनता पार्टीची स्थापना कोणी केली, प्रमुख मागण्या कोणत्या?; A टू Z माहिती
E20 जनता पार्टीची स्थापना कोणी केली, प्रमुख मागण्या कोणत्या?; A टू Z माहिती
Kanpur News : ओळखलंत का मला? मी तुमची पहिली पत्नी.., दुसऱ्या लग्नासाठी बोहल्यावर चढणाऱ्या नवरदेवाच्या लग्नात पहिल्या पत्नीची एन्ट्री; नववधूसह वऱ्हाडी थक्क, नवरदेवानं धूम ठोकली
ओळखलंत का मला? मी तुमची पहिली पत्नी.., दुसऱ्या लग्नासाठी बोहल्यावर चढणाऱ्या नवरदेवाच्या लग्नात पहिल्या पत्नीची एन्ट्री; नववधूसह वऱ्हाडी थक्क, नवरदेवानं धूम ठोकली
MPSC FDA Paper Leak Maharashtra: MPSC औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर कसा फुटला? रोहित पवारांनी सगळं खणून काढलं, सगळ्यांदेखत पुरावाच दाखवला
औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर कसा फुटला? रोहित पवारांनी सगळं खणून काढलं, सगळ्यांदेखत पुरावाच दाखवला
Nashik Crime: 13 वर्षीय चिमुकलीवर वारंवार अत्याचार, मानसिक अन् शारीरिक छळाला कंटाळून पीडितेनं जीवन संपवलं; शवविच्छेदनानंतर भयावह सत्य समोर आलं, नराधमास जन्मठेप
13 वर्षीय चिमुकलीवर वारंवार अत्याचार, मानसिक अन् शारीरिक छळाला कंटाळून पीडितेनं जीवन संपवलं; शवविच्छेदनानंतर भयावह सत्य समोर आलं, नराधमास जन्मठेप
Embed widget