एक्स्प्लोर
नाराज संजय राठोड मातोश्रीवर, राजीनामा देण्याचीही तयारी
मुंबई : यवतमाळचं पालकमंत्रिपद काढून घेतल्यानं संजय राठोड यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेतली. इतकंच नाही, तर नाराज झालेल्या संजय राठोड यांनी राजीनामा देण्याचीही तयारी दर्शवली आहे.
शिवसेनेच्या मंत्र्यांकडे असलेल्या पालकमंत्रिपदाची धुरा काढून घेतल्यामुळे शिवसेना आक्रमक झाली आहे. राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीतून शिवसेनेच्या मंत्र्यांना वॉकआऊट केलं. त्यामुळे शिवसेना-भाजपमधली धुसफूस पुन्हा समोर आली आहे.
मंत्रिमंडळ बैठकीतून शिवसेना वॉकआऊट
यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांचं पद काढून वाशिमच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी दिली आहे. वाशिम हा तुलनेनं छोटा जिल्हा आहे, त्यामुळे शिवसेना आक्रमक झाली आहे. परिणामी सेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement