एक्स्प्लोर

Yavatmal: लेक UPSC पास, पेढे वाटताना वडिलांना हार्टअटॅक, महाराष्ट्र हळहळला!

Yavatmal: एकीकडे मुलीचा आनंदाचा दिवस दुसरीकडे वडिलांच्या मृत्यूने क्षणार्धात कुटुंब पोरकं झालं . प्रल्हाद खंदारे असे मोहिनीच्या वडिलांचे नाव आहे

Yavatmal: केंद्रीय लोकसेवा परीक्षेचा निकाल जाहीर झाला . लेक UPSC परीक्षा उत्तीर्ण झाल्याचं कळताच पेढे वाटत आनंदोत्सव साजरा करताना वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यातच त्यांचे निधन झाल्याची दुःखद घटना घडलीय . यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातल्या वागद ( इजारा) येथे घडलेल्या या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे .प्रल्हाद खंदारे असे मृत्यमुखी पडलेल्या वडिलांचे नाव आहे .यूपीएससीच्या निकालानंतर मोहिनी प्रल्हाद खंदारेच्या वडिलांच्या निधनाने संपूर्ण खंदारे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे . (Yavatmal News)

लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत चांगली रँक मिळवत मोहिनी खंदारे या तरुणीनं कुटुंबीयांची मान उंचावली खरी मात्र आपल्या यशाचा आनंद साजरा करणाऱ्या वडिलांवर काळाने घाला घातल्यानं मोठं यश आयुष्यभराचं दुःख देऊन जाणारं ठरलंय .

लेक UPSC त उत्तीर्ण, पेढे वाटताना वडिलांना हार्टअटॅक

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला .यात मोहिनी प्रल्हाद खंदारे हिला 884 रँक मिळाला .मुलगी प्रशासकीय अधिकारी होणार या बातमीने सुखावलेल्या वडिलांनी गावकऱ्यांना पेढे वाटायला सुरुवात केली .ग्रामस्थांना पेढे वाटतानाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला .यातच त्यांचा मृत्यू झाला .एकीकडे मुलीचा आनंदाचा दिवस दुसरीकडे वडिलांच्या मृत्यूने क्षणार्धात कुटुंब पोरकं झालं . प्रल्हाद खंदारे असे मोहिनीच्या वडिलांचे नाव आहे .पुसद पंचायत समिती बुलढाणा येथे ते सेवानिवृत्त विस्तार अधिकारी होते . त्यांच्या मृत्यूने सारा गाव हळहळलाय.

खंदारे हे पुसद पंचायत समितीचे सेवानिवृत्त विस्तार अधिकारी असून  त्यांची मुलगी मोहिनी हिला केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत चांगली रँक मिळाली. हा आनंदोत्सव साजरा करताना प्रल्हाद खंदारे हे ग्रामस्थांना पेढे वाटत होते. या वेळी खंदारे यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे खंदारे परिवारावर आनंदाच्या क्षणी दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मोहिनी खंदारेने पुण्यात कोचिंग क्लासेस करत आपल्या अभ्यासावर भर देत हे यश मिळवले आहे. याआधी 2021 मध्ये एमपीएससी परीक्षेत यशस्वी झाली होती.

 

हेही वाचा:

उद्धव ठाकरेंना दे धक्का, एकनाथ शिंदेंना शिवीगाळ केलेल्या माजी महापौर दत्ता दळवींनी साथ सोडली

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Election Result 2026: नागपूरच्या मतमोजणीत पुन्हा मोठा ट्विस्ट; पोस्टल बॅलेटमध्ये भाजप समर्थक अनिल सोलेंची आघाडी; भाजप-काँग्रेसमध्ये अटीतटीचा सामना, निकालाची उत्कंठा कायम
नागपूरच्या मतमोजणीत पुन्हा मोठा ट्विस्ट; पोस्टल बॅलेटमध्ये भाजप समर्थक अनिल सोलेंची आघाडी; भाजप-काँग्रेसमध्ये अटीतटीचा सामना, निकालाची उत्कंठा कायम
वीजेचा धक्का लागून शिवसेना विभागप्रमुखाचा मृत्यू; नातेवाईकांसह शिवसेना कार्यकर्त्यांची रुग्णालयात गर्दी
वीजेचा धक्का लागून शिवसेना विभागप्रमुखाचा मृत्यू; नातेवाईकांसह शिवसेना कार्यकर्त्यांची रुग्णालयात गर्दी
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 Live: विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीत ट्विस्टवर ट्विस्ट; नागपूर, अमरावती अन् पुणे पदवीधरच्या जागांच्या निकालाची उत्कंठा कायम
विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीत ट्विस्टवर ट्विस्ट; नागपूर, अमरावती अन् पुणे पदवीधरच्या जागांच्या निकालाची उत्कंठा कायम
Nagpur MLC Election Result 2026: नागपूर पदवीधर निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांनी समजूत काढलेल्या अनिल सोलेंना किती मतं पडली, दुसऱ्या पसंतीची 41 मतं काँग्रेसच्या उमेदवाराला
नागपूर पदवीधर निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांनी समजूत काढलेल्या अनिल सोलेंना किती मतं पडली, दुसऱ्या पसंतीची 41 मतं काँग्रेसच्या उमेदवाराला

व्हिडीओ

Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Pratap Patil On Win : मराठवाड्यातील पदवीधरांच्या रोजगारासाठी मी काम करणार : प्रताप पाटील
Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज ठाकरे कर्जतच्या डोंगरात, स्थानिकांशी संवाद; साय डोंगरातील वृक्षतोड जवळून पाहिली, जाहीर सभेतून एल्गार
Raj Thackeray Karjat: राज ठाकरे कर्जतच्या डोंगरात, स्थानिकांशी संवाद; साय डोंगरातील वृक्षतोड जवळून पाहिली, जाहीर सभेतून एल्गार
Pune MLC Election : 6770 मतांचा फरक; विजयाच्या घोषणेची औपचारिकता बाकी, पुणे शिक्षक निवडणुकीत यश मिळाल्यानंतर कौस्तुभ गावडेंनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6770 मतांचा फरक; विजयाच्या घोषणेची औपचारिकता बाकी, पुणे शिक्षक निवडणुकीत यश मिळाल्यानंतर कौस्तुभ गावडेंनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
शिक्षक, पदवीधरमध्ये सत्ताधारी काँग्रेसला कर्नाटकात एकही जागा नाही, दारुण पराभव; बिहारमध्येही मोठा उलटफेर
शिक्षक, पदवीधरमध्ये सत्ताधारी काँग्रेसला कर्नाटकात एकही जागा नाही, दारुण पराभव; बिहारमध्येही मोठा उलटफेर
वीजेचा धक्का लागून शिवसेना विभागप्रमुखाचा मृत्यू; नातेवाईकांसह शिवसेना कार्यकर्त्यांची रुग्णालयात गर्दी
वीजेचा धक्का लागून शिवसेना विभागप्रमुखाचा मृत्यू; नातेवाईकांसह शिवसेना कार्यकर्त्यांची रुग्णालयात गर्दी
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 Winner Candidate List: विधान परिषदेच्या 5 पैकी 3 जागांचा निकाल जाहीर; सर्व विजयी उमेदवार यादीचे अपडेट्स
विधान परिषदेच्या 5 पैकी 3 जागांचा निकाल जाहीर; सर्व विजयी उमेदवार यादीचे अपडेट्स
Gokul Election: महायुतीचे नेते विशेष विमानाने गोकुळ संचालकांना भेटून गोव्यातून कोल्हापुरात; संचालकांची सुद्धा स्पेशल विमानाने एन्ट्री होणार? नेमक्या कोणत्या सूचना केल्या??
महायुतीचे नेते विशेष विमानाने गोकुळ संचालकांना भेटून गोव्यातून कोल्हापुरात; संचालकांची सुद्धा स्पेशल विमानाने एन्ट्री होणार? नेमक्या कोणत्या सूचना केल्या??
Raviraj Sable Patil : अपक्ष उमेदवार तरी मिळाली मोठी मतं फुटली अन् रीलस्टार रविराज साबळे मराठवाड्यात ठरले जायंट किलर! मराठवाडा पदवीधरच्या निवडणुकीत ट्विस्ट
अपक्ष उमेदवार तरी मिळाली मोठी मतं फुटली अन् रीलस्टार रविराज साबळे मराठवाड्यात ठरले जायंट किलर! मराठवाडा पदवीधरच्या निवडणुकीत ट्विस्ट
Chhatrapati Sambhajinagar Graduates Constituency Result 2026 : मी प्रस्थापित गिळलाय, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा निकाल, रिलस्टार रविराज साबळेंची प्रतिक्रिया, किती मतं?
मी प्रस्थापित गिळलाय, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा निकाल, रिलस्टार रविराज साबळेंची प्रतिक्रिया, किती मतं?
Embed widget