एक्स्प्लोर
चार मुलीच झाल्याने पत्नीला गुरासारखी मारहाण

यवतमाळ: चार मुली झाल्या, पण मुलगा नाही या कारणावरुन नवऱ्यानं बायकोला इतकी मारहाण केली आहे, की त्याची दृश्य पाहिल्यानंतर कोणाचाही थरकाप उडेल. इतकंच नाही तर चार मुलींसह पत्नीला घराबाहेरही काढण्यात आलं. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील वडद इथं हा प्रकार घडला. ज्ञानेश्वर मदन राठोड असं मारहाण करणाऱ्या पतीचं नाव आहे. ज्ञानेश्वरचं 2008 साली कवितासोबत लग्न झालं. त्यानंतर त्यांना चार मुली झाल्या. मात्र मुलगा होत नसल्यामुळे पतीनं छळ केला. तसंच पत्नीला बेदम मारहाण केली. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी पुसद पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
आणखी वाचा























