यवतमाळ : यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्याची (Yavatmal Doctor Murder Case) रात्री हत्या झाली. मूळचा ठाणे जिल्ह्यातील असलेल्या आणि एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या अशोक पाल या विद्यार्थ्याची यवतमाळ वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात हत्या करण्यात आली. घटनेनंतर महाविद्यालयातील विद्यार्थी संतप्त झाले आहेत आणि आंदोलन सुरू केलं. विद्यार्थ्याच्या हत्येचं कारण मात्र अस्पष्ट आहे. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 2 संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले आहे.



यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिकाऊ विद्यार्थी डॉक्टरची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे.  अशोक पाल हा MBBS च्या फायनल इअरचा विद्यार्थी होता.  हत्येचे कारण अस्पष्ट आहे. दरम्यान घटनेची माहिती कळताच मेडिकल परिसरात संतप्त विद्यार्थ्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली आहे.



शिकावू डॉक्टर यांनी मेडिकलचे गेट बंद केलं आहे. न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहणार अशी भूमिका घेत मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावले आहे. त्यामुळे मेडिकल आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. 


कुणालाही मेडिकल परिसरात प्रवेश नाही त्यामुळे रुग्ण बाहेर आहेत. मेडिकलची सुरक्षा व्यवस्था वाढवावी आणि आरोपींना अटक करावी तसेच मेडिकलचे डीन यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी शिकवू आंदोलक डॉक्टर यांनी केली आहे . आंदोलक विद्यार्थ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यवतमाळ यांचा प्रतिनिधिक पुतळा मेडिकल परिसरात जाळून निषेध केला आहे.



या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 2 संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले आहे.