Navi Mumbai Crime News : अगदी शुल्लक कारणावरुन हत्या, खून अशा घटना घडल्याचं पाहायला मिळतं. अशीच काहीशी घटना नवी मुंबईत घडली आहे. पैसे उधार देत नाही म्हणून, एका महिलेची हत्या करुन तिनं आत्महत्या केल्याचं भासवण्याचा प्रयत्न केला आहे. या आरोपीला हेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं आहे. 


उधार पैसे देत नसल्याच्या रागात एका महिलेची हत्या करून आत्महत्या भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुरुवातीला आत्महत्या अशी पोलीस दफ्तरी नोंदही करण्यात आली होती. मात्र दाखल झालेल्या एका तक्रारीमुळे पोलिसांनी तपास सुरु ठेवला आणि घटनेचं सत्य सर्वांसमोर आलं. उधार पैसे देत नसल्याच्या रागात एका महिलेची हत्या करून आत्महत्या भासवणाऱ्या आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.


नवी मुंबईत घणसोली येथे राहणाऱ्या मनोहर निकम आणि आरोपी श्रीमंत लेंढवे यांच्यात पैशावरून वाद झाले होते. आरोपीनं मनोहर निकम यांना 6 लाख 50 हजार दिले होते. 21 ॲाक्टोबरला आरोपी श्रीमंत लेंढवे हा मनोहर निकम यांच्या घरी आला होता. मनोहर निकम घरात नसल्याचं पाहुन त्यानं त्याच्या पत्नीबरोबर जोरदार भांडण केलं. एक तर पैसे दे नाही तर मरून जा, असा वाद आरोपीनं मनोहर निकम यांच्या पत्नी शीतल निकम यांच्याबरोर घातला. यावरून आपण आर्थिक कारणास्तव मरत आहे, अशा आशयाची चिठ्ठी रागाच्या भरात शीतल यांनी लिहिली. 


सुसाईड नोट लिहीताच आरोपी श्रीमंत लेंढवे यानं शिकाल निकम यांचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्यांचा मृतदेह फॅनला लटकवला. फॅनला लटकून आत्महत्या झाली असल्याचं चित्र तयार करून तो निघून गेला होता. पोलिसांनी ही आत्महत्या असल्याची सुरुवातीला नोंदही केली होती. मात्र शेजारच्यांनी आरोपी घरी येवून गेला असल्याचं शीतल निकम यांच्या पतीला सांगितलं. त्यानंतर संशय आल्यानं पतीनं पोलीस ठाण्यात आरोपी श्रीमंत लेंढवे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यानंतर आरोपीनं आपला गुन्हा कबूल केला आणि घडला प्रकार पोलिसांना सांगितला. या घटनेनं परिसरात खळबळ पसरली आहे. तसेच पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :