एक्स्प्लोर

यवतमाळमधील अपहरणनाट्याचा उलगडा, भाजप युवा मोर्चाचा पदाधिकारी मास्टरमाईंड

यवतमाळच्या शिवाजी गार्डन परिसरातून ईश्वर नचवाणी या व्यावसायिकाच्या 18 वर्षीय मुलगा हर्ष नचवाणीचं अपहरण करण्यात आलं होतं.

यवतमाळ : व्यावसायिकाच्या मुलाचं अपहरण करुन 50 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या अपहरणकर्त्यांना यवतमाळ पोलिसांनी अवघ्या दहा तासात अटक केली आहे. विषेश म्हणजे अटक झालेल्यांमध्ये भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याचा समावेश आहे. शुभम तोलवानी असं त्याचं नाव असून त्याच्यासह पाच जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. क्रिकेट सट्ट्यात पैसे हरल्याने त्याने हे कृत्य केल्याचं समोर आलं आहे. यवतमाळच्या शिवाजी गार्डन परिसरातून ईश्वर नचवाणी या व्यावसायिकाच्या 18 वर्षीय मुलगा हर्ष नचवाणीचं अपहरण करण्यात आलं होतं. भरदिवसा सकाळी अकराच्या सुमारास चाकूचा धाक दाखवून हर्ष नचवाणीचं अपहरण केलं. त्यानंतर ते हर्षला जंगलात घेऊन गेले आणि तिथे त्याला मारहाण केली. मग अपहरणकर्त्यांनी हर्षच्या वडिलांना व्हिडीओ कॉल करुन 50 लाखांची खंडणी मागितली. तासाभरात रक्कम मिळाली नाही तर जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली होती . या घटनेमुळे घाबरलेल्या ईश्वर नचवाणी यांनी पोलिसांत धाव घेतली. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ पाऊल उचललं. पोलिसांची सहा पथकं तयार करुन हर्षचा शोध सुरु केला. यवतमाळजवळ असलेल्या एमआयडीसी परिसरातील जंगलासह अनेक ठिकाणं पिंजून काढली आणि अवघ्या दहा तासाच्या आत सर्व अपहरणकर्त्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. क्रिकेट सट्ट्यात पैसे हरल्याने अपहरण करुन हरलेले पैसे मिळवण्यासाठी आरोपी शुभम तोलवानी आणि त्याच्या पाच साथीदारांनी हर्षच्या अपहरणाचा कट रचला होता, हे पोलिस तपासात उघड झालं आहे. हर्ष सुखरुप घरी परत आल्याने त्याच्या कुटुंबीयांचा जीव भांड्यात पडला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: राज्य मंत्रिमंडळाची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक
Maharashtra Live News Updates: राज्य मंत्रिमंडळाची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक
Amravati Hospital Fire baby death: अमरावतीच्या रुग्णालयात आग, तीन नवजात बालकांचा मृत्यू, रवी राणांचा डॉक्टर-कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप, म्हणाले...
अमरावतीच्या रुग्णालयात आग, तीन बालकांचा मृत्यू, रवी राणांचा डॉक्टर-कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप, म्हणाले...
Nagpur Chlorine Gas Leaks: नागपूरच्या गोधनी परिसरात क्लोरिन गॅसची गळती; 40हुन अधिक स्थानिकांना मळमळ अन् उलट्यांचा त्रास, NDRF पथकाकडून बचावकार्य सुरु
नागपूरच्या गोधनी ग्रामपंचायत परिसरात क्लोरिन गॅसची गळती; 40हुन अधिक स्थानिकांना मळमळ अन् उलट्यांचा त्रास, NDRF पथकाकडून बचावकार्य सुरु
Amravati Fire baby death: नवजात बाळांच्या कक्षात आगीच्या ज्वाळा, दोन नर्सेस जीवाची पर्वा न करता आत शिरल्या, हात भाजले तरीही....
नवजात बाळांच्या कक्षात आगीच्या ज्वाळा, दोन नर्सेस जीवाची पर्वा न करता आत शिरल्या, हात भाजले तरीही....

व्हिडीओ

Amravati News : एवढी आग होती, जीवाची पर्वा न करता लेकरांन बाहेर काढलं, परिचारिकांनी सांगितला थरार
Amravati hospital fire news : व्हेंटिलेटरचा स्फोट, ICU कक्षात आग, अमरावतीत ३ बालकं दगावली
Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha
Bhuleshwarcha Raja Special Report : भुलेश्वरच्या दुर्घटनेचं कारण काय? मुंबईतील गणेश मंडळं सावध
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Brydon Carse Night Club VIDEO : नाईट क्लबबाहेर हातात बेड्या... स्टार क्रिकेटरला पोलिसांनी घेतलं ताब्यात, रात्री नेमकं काय घडलं?, क्रिकेटविश्वाला हादरवणारा VIDEO
नाईट क्लबबाहेर हातात बेड्या... स्टार क्रिकेटरला पोलिसांनी घेतलं ताब्यात, रात्री नेमकं काय घडलं?, क्रिकेटविश्वाला हादरवणारा VIDEO
Amravati Hospital Fire baby death: अमरावतीच्या रुग्णालयात आग, तीन नवजात बालकांचा मृत्यू, रवी राणांचा डॉक्टर-कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप, म्हणाले...
अमरावतीच्या रुग्णालयात आग, तीन बालकांचा मृत्यू, रवी राणांचा डॉक्टर-कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप, म्हणाले...
Miss Universe India 2026: केरळची काझिया लिझ मेजो ठरली 'मिस युनिव्हर्स इंडिया 2026' ची मानकरी; 'मिस युनिव्हर्स' स्पर्धेतही करणार भारताचे प्रतिनिधित्व
केरळची काझिया लिझ मेजो ठरली 'मिस युनिव्हर्स इंडिया 2026' ची मानकरी; 'मिस युनिव्हर्स' स्पर्धेतही करणार भारताचे प्रतिनिधित्व
IND vs SL 2nd TEST Day-2 LIVE : पडिक्कलने पाया रचला, आता पंत अन् जुरेल घालणार धुमाकूळ... दुसऱ्या दिवशीचा खेळ किती वाजता होणार सुरू? जाणून घ्या LIVE अपडेट
पडिक्कलने पाया रचला, आता पंत अन् जुरेल घालणार धुमाकूळ... दुसऱ्या दिवशीचा खेळ किती वाजता होणार सुरू? जाणून घ्या LIVE अपडेट
Maharashtra Live News Updates: राज्य मंत्रिमंडळाची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक
Maharashtra Live News Updates: राज्य मंत्रिमंडळाची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक
Amravati Hospital Fire: व्हेंटिलेटरचा स्फोट, नवजात बाळांच्या कक्षात आग; 12 पैकी 3 चिमुकल्यांचा मृत्यू; अमरावतीच्या स्त्री रुग्णालयातील घटना, अंगावर काटा आणणारे 7 फोटो
व्हेंटिलेटरचा स्फोट, नवजात बाळांच्या कक्षात आग; 12 पैकी 3 चिमुकल्यांचा मृत्यू; अमरावतीच्या स्त्री रुग्णालयातील घटना, अंगावर काटा आणणारे 7 फोटो

Embed widget