Beed News Update : परळीमध्ये तीन दिवसांत दोन खुनाच्या घटना घडल्या आहेत. परळीत एका 50 वर्षीय महिलेची चाकूने सपासप वार करून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. याच घटनेत मृत महिलेची 16 वर्षीय मुलगी जखमी झाली आहे. परळी शहराजवळ असलेल्या आयेशा नगर भागात ही घटना घडली आहे. 


दोन दिवसांपूर्वीच परळी शहराजवळील एका गावात दोघांचा खून झाल्याची घटना  घडली होती. त्यानंतर आज पुन्हा एका महिलेचा खून झाला असून ही तीन दिवसातील खूनाची दुसरी घटना आहे. मदिना मंजीद शेख असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तिची मुलगी मुस्कान ही हल्ल्यात जखमी झाली असून आर्थिक व्यवहारातून हा खून झाला असल्याची चर्चा आहे.  


खुनाची घटना घडल्यानंतर अवघ्या दोन तासांत परळी पोलिसांनी माजलगावच्या शेख एजाज अहमद या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. घटना घडल्यानंतर आरोपी त्या परिसरातून पळून गेला होता. मात्र, परळी पोलिसांनी दोन तासांत त्याला गंगाखेड रोडवरच्या एका धाब्यावरून ताब्यात घेतले.  


दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच परळी शहराजवळील एका गावात दोघांचा खून झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा खून झाला असून तीन दिवसातील खूनाची ही दुसरी घटना असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दोन दिवसांपूर्वी  बहीण आणि भावाचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आला होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती.  


जिरेवाडी शिवारात नदीलगत सटवा ग्यानबा मुंडे (रा. जिरवाडी, वय ६८) यांचे शेत आहे. याच शेतात त्यांच्या बहीण शुभ्रा ग्यानबा मुंडे (वय ७०) त्यांच्याकडे राहत होत्या. या दोघा बहीण-भावाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. नेहमी शांत असलेल्या जिरेवाडी परिसरात बहीण -भावांची निर्घृण हत्या झाल्याने गाव हादरले होते. 


महत्वाच्या बातम्या