बीड: शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील रजिस्ट्री ऑफिसच्या समोर कुकरीने हल्ला करत सतीश पवार आणि इतरांना रजिस्ट्री करण्यापासून रोखल्याच्या फिर्यादीवरुन रविंद्र क्षीरसागर, हेमंत क्षीरसागर, अर्जुन क्षीरसागर यांच्यासह इतरांवर प्राणघातक हल्ल्यासह दरोड्याचा गुन्हा दाखल झाले आहेत. शुक्रवारी बीड मध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणानंतर संदीप क्षीसागर विरुद्ध भारतभूषण क्षीरसागर हा चुलता पुण्यातील वाद आता पोलीस स्टेशन पर्यंत  पोहोचल्याचा पाहायला मिळत आहे.. काल झालेल्या गोळीबार प्रकरणी रात्री उशिरा बीडचे नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर आणि नगरसेवक योगेश क्षीरसागर यांच्या विरोधामध्ये बीडच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये 307 कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता.


आज प्रतिभा क्षीरसागर यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीसागर यांचे वडील रवींद्र क्षीरसागर, त्यांचे भाऊ हेमंत क्षीरसागर आणि अर्जुन क्षीरसागर यांच्या विरोधात प्राणघातक हल्ला आणि दरोड्या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.


प्रतिभा क्षीरसागर यांची फिर्याद काय आहे?
शुक्रवारी बीडच्या रजिस्ट्री कार्यालयात गोळीबाराची घटना घडल्यानंतर शनिवारी त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. आम्ही जयदत्त क्षीरसागर यांच्याकडून जागा खरेदी करत होतो. त्यावेळी शुक्रवारी रजिस्ट्री कार्यालयात रविंद्र क्षीरसागर, हेमंत क्षीरसागर, अर्जुन क्षीरसागर, सतीश क्षीरसागर, फारुक सिद्दीकी , आनंद पवार, गणेश भरनाळे, अशोक रोमण यांनी रजिस्ट्री का करताय म्हणून मारहाण केली, तसेच कुकरीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तसेच लाखोंची रक्कम लांबविली अशी फिर्याद सतीश पवार यांच्या बहिण प्रतिभा श्रीराम क्षीरसागर यांनी दिली आहे. यावरुन शिवाजी नगर पोलीसात रवींद्र क्षीरसागर व इतरांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामुळे आता क्षीरसागर कुटुंबातील वाद अधिक चिघळले आहेत.


संदीप क्षीरसागर यांच्या दबावामुळे गुन्हे दाखल, सारिका क्षीरसागर यांचा आरोप
शुक्रवारी बीड शहरामध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणानंतर नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर, नगरसेवक योगेश क्षीरसागर यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र हे गुन्हे राजकीय दबावातून दाखल झाले असल्याचा आरोप योगेश क्षीरसागर यांच्या पत्नी सारिका क्षीरसागर यांनी केलाय.


गुन्हे मागे घ्यावेत, यासाठी  शिवसेना आक्रमक झाली आहे. डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या स्नुषा डॉ. सारिका क्षीरसागर यांच्यासह सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बीडमध्ये पायी मोर्चा काढत पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन दिले.


गोळीबार प्रकरणावेळी घटनास्थळी नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर आणि नगरसेवक योगेश क्षीरसागर हे हजर नव्हते. तरीही त्यांच्यावर ती गुन्हे दाखल केले हे गुन्हे केवळ राजकीय दबावातून प्रशासनाने दाखल केले आहेत असा आरोप सारिका क्षीरसागर यांचा आहे.


संबंधित बातम्या: