एक्स्प्लोर
चंद्रपुरात पतंगाचा मांजा गळ्यात अडकल्याने महिला खेळाडू जखमी
![चंद्रपुरात पतंगाचा मांजा गळ्यात अडकल्याने महिला खेळाडू जखमी Women Athlete Injured By Manja In Chandrapur चंद्रपुरात पतंगाचा मांजा गळ्यात अडकल्याने महिला खेळाडू जखमी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/12181550/Chandrapur-Girl-.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
चंद्रपूर : पतंगाचा मांजा गळ्यात अडकल्याने दुचाकीवरील महिला खेळाडू जखमी झाल्याची घटना चंद्रपूरमध्ये घडली आहे. सपना सोनकर असं या महिला खेळाडूचं नाव
असून, नेहमीप्रमाणे सपना चंद्रपूरच्या जिल्हा क्रीडा संकुलात सरावासाठी निघाली होती. गाडीवरुन भरधाव वेगात जात असताना तिच्या गळ्याला मांजा लागला आणि ती महामार्गावरच कोसळली. या दुर्घटनेत तिच्या गळ्याला मोठी जखम झाली.
चंद्रपूर शहराच्या महाकाली कॉलरी क्षेत्रात राहणारी सपना सोनकर नामक या खेळाडूवर सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नेहमीप्रमाणे सपना आपल्या दुचाकीवरून चंद्रपूरच्या जिल्हा क्रीडा संकुलात सरावासाठी निघाली होती. बायपास वळणावर तिची गाडी भरधाव वेगात असताना तिच्या गळ्याला मांजाचा स्पर्श झाला. तिने या मांजाला दूर सारण्याचा प्रयत्न केला. मात्र, मांजा गळ्याभोवती अधिक घट्ट झाला. वेग कमी करत तिने संतुलन साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, अखेर ती महामार्गावरच कोसळली.
मांजामुळे सपनाच्या गळ्याला जखमा झाल्याने मोठा रक्तस्राव झाला. काही लोक मदतीला आल्याने तिला वेळेवर उपचार मिळाले. त्यामुळे तिचा जीव वाचला. हे सर्व पतंगबाजीसाठी वापरल्या जाणाऱ्या नायलॉन मांजामुळे घडले.
तज्ज्ञांच्या मतानुसार, गळ्याला अशा प्रकारे झालेली एक छोटी जखम देखील जीवघेणी ठरू शकते. अशा प्रकारच्या मांजाचा पतंगबाजीत टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)