एक्स्प्लोर
नांदेडमध्ये दोन महिन्याच्या मुलीला नाल्यात फेकून महिला फरार
नांदेडमध्ये दोन महिन्याच्या मुलीला फेकून महिला फरार झाल्याची घटना समोर आली आहे.

नांदेड : पुण्यात आईनंच पोटच्या मुलीला नदीत फेकून दिल्याची घटना ताजी असताना दुसरीकडे नांदेडमध्ये दोन महिन्याच्या चिमुकल्या मुलीला नाल्यात फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नादेंडमधील देगलूर येथील लोहिया मैदान परिसरात ही घडली आहे. मुलीला एका महिलेनं फेकल्याची प्राथमिक माहिती सध्या समजतं आहे. मुलीला नाल्यात फेकल्यानंतर अज्ञात महिलेनं तिथून तात्काळ पळ काढला. काही लोकांनी वेळीच मुलीला पाहिल्यानं तिला नाल्यातून बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. सुदैवानं मुलीची प्रकृती चांगली असून संबंधित महिलेचा सध्या शोध सुरु आहे. नेमकं कुणी आणि कशासाठी या चिमुकलीला फेकलं याचा सध्या पोलीस कसून तपास करत आहेत. दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी पुण्यात एका आईन पोटच्या मुलीला नदीत फेकून मुलीच्या अपहरणाचा कांगावा केला होता. मात्र, पोलीस चौकशीत आपणच मुलीला फेकल्याचं रेश्मा शेखनं कबूल केलं. संबंधित बातम्या : पोटच्या पोरीला नदीत फेकून आईचा अपहरणाचा टाहो
Before You Go
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















