एक्स्प्लोर

हाडवैर संपणार, विलासकाका-पृथ्वीबाबांचं मनोमिलन होणार?

कऱ्हाडमध्ये काँग्रेस मजबूत व्हावी, त्यासाठी माजी मंत्री विलासकाका उंडाळकर यांना पक्षात परत घेण्यासाठी काँग्रेसने तयारी दर्शवली आहे.

सातारा: कऱ्हाडमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी मंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांचं हाडवैर सर्वांना परिचीत आहे. मात्र आता या दोघांचं मनोमिलन होण्याची चिन्हं आहेत. कारण कऱ्हाडमध्ये काँग्रेस मजबूत व्हावी, त्यासाठी माजी मंत्री विलासकाका उंडाळकर यांना पक्षात परत घेण्यासाठी काँग्रेसने तयारी दर्शवली आहे. त्याबाबत काँग्रेसमध्ये एकमतही झालं आहे. याबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी विलासकाकांसोबत जुळवून घ्यावे असं पक्षश्रेष्ठींचं म्हणणं आहे. विलासकाका उंडाळकर हे काँग्रेसचे दक्षिण कऱ्हाड मतदारसंघातून 30 वर्षे आमदार होते. 1980 ते 2009 पर्यंत उंडाळकरांनी या मतदारसंघाचं नेतृत्त्व केलं. मात्र  2014 च्या विधानसभा निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेसने दक्षिण कऱ्हाडमधून उमेदवारी दिल्याने, विलासकाकांनी नाराज होऊन पक्ष सोडला. त्यांनी अपक्ष म्हणून पृथ्वीराज चव्हाणांविरोधात निवडणूक लढवली. या निवडणुकीच्या प्रचारसभांमध्ये विलासकाका उंडाळकरांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली होती. विलासकाकांनी पृथ्वीराज चव्हाणांच्या नाकी दम आणला होता. पण शेवटी पृथ्वीराज चव्हाणांनीच निवडणुकीत बाजी मारली होती. आपल्या संपूर्ण कुटुंबाला पृथ्वीराज चव्हाण यांनी विधी आणि गृहखात्याचा वापर करत अडकवण्याचा प्रयत्न केल्याचं उंडाळकर यांनी म्हटलं होतं.  तर राज्यातल्या काँग्रेसच्या पानिपताला पृथ्वीराज चव्हाणच जबाबदार असल्याचा आरोपही विलासकाका उंडाळकर यांनी केला होता. दक्षिण कराड मतदारसंघातून विजयी होण्यासाठी पृथ्वीराज चव्हाणांनी धनशक्तीचा वापर केल्याचा आरोपही विलासकाका उंडाळकरांनी केला होता. त्यामुळं पराभव झाल्यानंतर विलासकाकांनी पृथ्वीराज चव्हाणांवर घणाघात सुरु केल्याचं चित्र होतं. या सर्व पार्श्वभूमीनंतर आता कऱ्हाडमध्ये पुन्हा काँग्रेसला ताकद देण्यासाठी, विलासकाका आणि पृथ्वीराजबाबा यांच्यातील वैर मिटवण्याचे प्रयत्न पक्षातून होत आहेत. अशोक चव्हाण यांची भूमिका दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी पक्षाच्या बळकटीसाठी काहीही करण्यास तयार आहोत, पण या विषयात पृथ्वीराज चव्हाण यांनी पुढाकार घ्यावा असं म्हटलं होतं. ते जो निर्णय घेतील, तो आपल्याला मान्य असेल. दोघांचं मनोमिलन व्हावं ही आपली इच्छा आहे, असं अशोक चव्हाण काही दिवसांपूर्वी म्हणाले होते.

महत्त्वाच्या बातम्या

काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरण! माजी महापौर मिनाक्षी शिंदेंना चौकशीला बोलावणार? सुत्रांनी दिली महत्वाची माहिती
प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरण! माजी महापौर मिनाक्षी शिंदेंना चौकशीला बोलावणार? सुत्रांनी दिली महत्वाची माहिती
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Piyush Goyal Vs Rahul Gandhi : 'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
Embed widget