एक्स्प्लोर

मुंबईच्या महापौरपदी कुणाची वर्णी?

भाजपाचे एकूण 83 नगरसेवक आहेत. तर शिवसेनेचे अपक्षांसह एकूण 94 नगरसेवक आहे. विधानसभा निवडणूकीनंतर सेना-भाजपमध्ये आलेलं वितुष्ट पाहता भाजपनं महापालिकेतली पहारेक-याची भूमीका सोडली तर यंदाची महापौर निवडणूक सेनेला जड जाऊ शकेल.

मुंबई : सध्या राज्यातील अस्थिर राजकिय परिस्थिती आणि सेना-भाजपमधील वाढती दरी पाहता मुंबई महापौरपदाची निवडणूक चांगलीच रंगतदार होण्याची शक्यता  आहे.  मुंबई महापालिकेत सध्या भाजप पहारेकऱ्याच्या भूमीकेत आहे. मात्र, विधानसभा निवडणूकीनंतर सेना-भाजपमध्ये आलेलं वितुष्ट पाहता भाजपनं महापालिकेतली पहारेक-याची भूमीका सोडली तर यंदाची महापौर निवडणूक सेनेला जड जाऊ शकेल. कशी होईल महापौर पदाची निवडणूक मुंबई शहराचे महापौर पद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. खुल्या प्रवर्गातून कोणताही महिला किंवा पुरुष नगरसेवक महापौर होऊ शकत असल्याने महापौर पदासाठी इच्छुक नगरसेवकांची संख्या  वाढणार आहे. या पदासाठी येत्या 22 नोव्हेंबरला निवडणूक होत आहे तर 18 नोव्हेंबर ही महापौरपदाची उमेदवारी भरण्यासाठीची अंतिम तारीख आहे. 2017 मध्ये झालेल्या मुंबई महापालिका निवडणूकीनंतर भाजपनं 83 नगरसेवकांसह पहारेक-याची भूमीका स्विकारली. शिवसेनेकडे सर्व समित्यांची अध्यक्षपदे आणि महापौरपदही आले. मात्र,आता पुढील अडीच वर्षांसाठी निवडल्या जाणा-या महापौरपदाच्या निवडणूकीत भाजप ही पहारेक-याची भूमीका सोडेल का यावर सर्वांचं लक्ष आहे. भाजपची भूमीका काय? विधानसभा निवडणूकीत मुख्यमंत्रीपदावरुन भाज-सेनेत वितुष्ट आलं आणि सेनेनं पाठिंबा न दिल्यानं भाजपला मोठा पक्ष ठरुनही सत्ता स्थापन करता आली नाही. त्यामुळे, भाजपनं महापौरपदाच्या निवडणूकीत उतरायचा निर्णय घेतला तर सेनेसाठी अडचणी निर्माण होण्याची शक्यत आहे. भाजपची यंदाच्या महापौर पदाच्या निवडणूकीतील भूमीका काय असेल हे कोअर कमिटीच्या बैठकीत ठरेल असं भाजपच्या वरिष्ठ नेत्याकडून सांगण्यात आलं आहे. मुंबईच्या महापौर पदासाठी या नगरसेवकांमध्ये चुरस यशवंत जाधव - मुंबई महापालिकेत गेले 25 वर्ष शिवसेनेची सत्ता आहे. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांचे मागच्या वेळेला महापौर पद हुकले होते. पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या त्यांच्या हातात आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पत्नी यामिनी जाधव या आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. मंगेश सातमकर- माजी शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांचीही मागील वेळेस महापौर बनण्याची संधी हुकली होती. आशिष चेंबूरकर- माजी बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर हे दक्षिण मुंबईचे विभाग प्रमुख आहेत. चेंबूरकर वरळीतील नगरसेवक आहेत. वरळीतून  युवा नेते आदित्य ठाकरे यांना मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत. किशोरी पेडणेकर- महिला विभाग प्रमुख किशोरी पेडणेकर यांनाही अनेक वेळा समित्यांच्या अध्यक्ष पदाने चकवा दिला आहे. आदित्य ठाकरे आमदार झाल्याने त्यांचीही महापौर पदावर वर्णी लागू शकते. शेखर वायंगणकर- मातोश्रीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या प्रभागात शेखर वायंगणकर हे सेना नेते अनिल परब व महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या जवळचे नगरसेवक आहेत. विशाखा राऊत- सभागृह नेत्या आणि माजी आमदार विशाखा राऊत यांना महापौर बनवून त्यांच्या जागी माजी महापौर श्रद्धा जाधव यांना सभागृह नेता बनवले जाईल अशी चर्चाही महापालिकेत आहे. महापालिकेतील पक्षांचे संख्याबळ भाजपचे एकूण 83 नगरसेवक शिवसेनेचे अपक्षांसह एकूण 94 काँग्रेसचे 29 आणि राष्ट्रवादीचे 8

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Rain: मुंबईत पर्यटन करू नका, ऐकलं नाही तर सक्ती करावी लागेल; मंत्री गिरीश महाजनांचा मुंबईकरांना कडक इशारा
मुंबईत पर्यटन करू नका, ऐकलं नाही तर सक्ती करावी लागेल; मंत्री गिरीश महाजनांचा मुंबईकरांना कडक इशारा
Maharashtra Rain LIVE: राज्यभरात मुसळधार पाऊस, मुंबई-पुणे मिसिंग लिंकवरचा स्लॅब फोडून माती अन् पाण्याचा प्रचंड लोंढा, प्रशासनाकडून महत्वाचं आवाहन
Maharashtra Rain LIVE: राज्यभरात मुसळधार पाऊस, मुंबई-पुणे मिसिंग लिंकवरचा स्लॅब फोडून माती अन् पाण्याचा प्रचंड लोंढा, प्रशासनाकडून महत्वाचं आवाहन
Mumbai Rain Red Alert: मुंबईकरांनो विचार करुन घराबाहेर पडा! पावसाचा ऑरेंज अलर्ट रेडमध्ये कन्व्हर्ट झाला, 80-90 किमीच्या वेगाने वारे वाहण्याचा इशारा
मुंबईकरांनो विचार करुन घराबाहेर पडा! पावसाचा ऑरेंज अलर्ट रेडमध्ये कन्व्हर्ट झाला, 80-90 किमीच्या वेगाने वारे वाहण्याचा इशारा
Mumbai Pune Missing Link Land Slide: मिसिंग लिंकच्या खड्ड्यांवर देवेंद्र फडणवीसांनी इंजिनिअरिंग टेक्निक सांगितली, आता दरड कोसळताच रोहित पवारांनी कोंडीत पकडलं, म्हणाले....
मिसिंग लिंकच्या खड्ड्यांवर देवेंद्र फडणवीसांनी इंजिनिअरिंग टेक्निक सांगितली, आता दरड कोसळताच रोहित पवारांनी कोंडीत पकडलं, म्हणाले....

व्हिडीओ

Anandache Paan : तीस लेखिका तीस संघर्ष, अनवट पुस्तकावर गप्पा, पाहा आनंदाचे पान
Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha
Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report
Mumbai Rain Tree Fall | मुंबईच्या रस्त्यांवर मृत्यूच्या झाडांचं 'जाळं' | ABP Majha Special Report
Dr. Budhajirao Mulik On Majha Katta :शेतकरी राजा कधी होईल? कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक माझा कट्ट्यावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Rain News: इंद्रायणी नदीला पूर, आळंदीत प्रवेश करणारे चारही पूल पाण्याखाली; वारकऱ्यांची होणार अडचण, धडकी भरवणारे फोटो
इंद्रायणी नदीला पूर, आळंदीत प्रवेश करणारे चारही पूल पाण्याखाली; वारकऱ्यांची होणार अडचण, धडकी भरवणारे फोटो
Raigad Rain Update: महाडमध्ये सावित्री नदीचं पाणी शिरलं, बाजारपेठ जलमय; रायगडला 'रेड अलर्ट', अनेक महामार्ग वाहतुकीसाठी बंद
महाडमध्ये सावित्री नदीचं पाणी शिरलं, बाजारपेठ जलमय; रायगडला 'रेड अलर्ट', अनेक महामार्ग वाहतुकीसाठी बंद
Heavy Rain Lonavala: लोणावळ्यात धडकी भरवणारा पाऊस, 24 तासांत 670 मिमी, पुणे घाटमाथ्यावर अतिवृष्टी
लोणावळ्यात धडकी भरवणारा पाऊस, 24 तासांत 670 मिमी, पुणे घाटमाथ्यावर अतिवृष्टी
Landslide on Mumbai Pune Railway Line: मुंबई-पुणे लोहमार्गावर दरड; रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प, कोसळणारा पाऊस अन् दगड-मातीच्या ढिगाऱ्याचे अंगावर काटा आणणारे PHOTOs
मुंबई-पुणे लोहमार्गावर दरड; रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प, कोसळणारा पाऊस अन् दगड-मातीच्या ढिगाऱ्याचे अंगावर काटा आणणारे PHOTOs
Mumbai Rain Nalasopara: नालासोपाऱ्यात भयानक पाऊस, रेल्वेचा प्लॅटफॉर्म बुडेपर्यंत पाणी साचलं, लोकल ट्रेनची वाहतूक विस्कळीत
नालासोपाऱ्यात भयानक पाऊस, रेल्वेचा प्लॅटफॉर्म बुडेपर्यंत पाणी साचलं, लोकल ट्रेनची वाहतूक विस्कळीत
Aamir Khan Gauri Spratt Marriage: आमिरनं गौरीचा हात हातात घेतला अन् सर्वांसमोर किस केलं; साठीच्या 'मिस्टर परफेक्शनिस्ट'चा तिसरा लग्नसोहळा, आधीच्या दोन घटस्फोटीत बायकांची अनुपस्थिती, पण मुलांसह जावयाची हजेरी
आमिरनं गौरीचा हात हातात घेतला अन् सर्वांसमोर किस केलं; साठीच्या 'मिस्टर परफेक्शनिस्ट'चा तिसरा लग्नसोहळा, घटस्फोटीत पत्नी गैरहजर, मात्र मुलांसह जावयाची हजेरी
Mumbai Pune Missing Link Land Slide: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवरचा भयानक व्हिडीओ, स्लॅब फोडून माती अन् पाण्याचा प्रचंड लोंढा आत शिरला
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवरचा भयानक व्हिडीओ, स्लॅब फोडून माती अन् पाण्याचा प्रचंड लोंढा आत शिरला
Maharashtra Rain Update: मुंबईसह उपनगरांना मुसळधार पावसाने झोडपले, तिन्ही मार्गांवरील लोकल सेवा विस्कळीत, रस्ते वाहतूक ठप्प; अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट, कोण-कोणते रस्ते बंद? A टू Z माहिती
मुंबईसह उपनगरांना मुसळधार पावसाने झोडपले, तिन्ही मार्गांवरील लोकल सेवा विस्कळीत, रस्ते वाहतूक ठप्प; अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट, कोण-कोणते रस्ते बंद? A टू Z माहिती
Embed widget