एक्स्प्लोर

Ramesh Bais: कोश्यारींना रिप्लेस करणारे महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल रमेश बैस कोण आहेत? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra New Governor : राष्ट्रपतींनी रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे.

Ramesh Bais Maharashtra New Governor : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचा राजीनामा (Resignation) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला आहे. राष्ट्रपतींनी रमेश बैस (Ramesh Bais) यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे. बैस हे महाराष्ट्राचे 20 वे राज्यापाल आहेत.  महाराष्ट्रासह 13 राज्यांना नवीन राज्यपाल मिळाले आहेत. रमेश बैस झारखंडचे राज्यपाल होते. रमेश बैस यांचा जन्म 2 ऑगस्ट 1947 मध्ये झाला. त्यांनी भोपाळमध्ये पीएससीचं शिक्षण घेतलं आहे. त्यांनी शेतीही केली. 

रमेश बैस यांचा जन्म मध्यप्रदेशातील रायपूरमध्ये झाला आहे. आता रायपूर छत्तीसगडमध्ये आहे.  रमेश बैस यांना जुलै 2021 मध्ये झारखंडचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले होते. याआधी जुलै 2019 ते 2021 पर्यंत त्रिपुराचे राज्यपाल म्हणून त्यांनी काम पाहिले. 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा सत्तेत आले होते तेव्हा त्यांना त्रिपुराचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले होते.  मध्य प्रदेश भाजपचे ते उपाध्यक्ष होते.

रमेश बैस यांनी नगरपालिकेतून आपल्या राजकीय करिअरला सुरुवात केली होती. 1978 मध्ये ते सर्वप्रथम नगरपालिकेत निवडून आले होते.  त्यानंतर 1980 ते 84 मध्ये मध्यप्रदेश विधानसभेचे सदस्य होते.  पण 1985 मध्ये त्यांना पराभवाचा धक्का बसला होता. त्यानंतर 1989 मध्ये रायपूर येथील लोकसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला होता. ते रायपूर लोकसभा मतदारसंघातून सलग सात वेळा खासदार राहिले आहेत. रमेश बैस यांनी केंद्रातही राज्यमंत्रीपद भूषवले आहे. 1999 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळात बैस यांनी केंद्रीय पर्यावरण आणि वन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) म्हणून काम केले होते. वाजपेयी सरकारच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या कार्यकाळात बैस यांनी पोलाद, खाणी, रसायने आणि खते, माहिती आणि प्रसारण या विभागाचा कार्यभार सांभाळला आहे. 

2019 मध्ये तिकिट नाकारले 

2019 निवडणुकीमध्ये भाजपने रमेश बैस यांना तिकिट नाकारले होते. त्यानंतर त्यांची नाराजी समोर आली होती. त्यानंतरही त्यांनी भाजपचा प्रचार केला होता. याचं फळही त्यांना लगेच मिळालं होतं. मोदी सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर बैस यांना त्रिपुराचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले होते.  

भगतसिंह कोश्यारी यांच्याबाबत विरोधक आणि सर्वसामान्य लोकांमध्ये संताप 

महाराष्ट्राचे राज्यपाल झाल्यापासून भगतसिंह कोश्यारी पहिल्या दिवसांपासून चर्चेत होते. त्यांनी मराठीतून शपथ घेतली होती. त्यानंतर राज्यातील राजकारण तापण्यापर्यंत त्यांनी वेळोवेळी अनेक वादग्रस्त वक्तव्य केली होती. राज्यात त्यांच्याबद्दल विरोधक आणि सर्वसामान्य लोकांमध्ये संताप होता. त्यांच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी होत होती. अनेक ठिकाणी विरोधकांनी आंदोलन आणि मोर्चे देखील काढले होते. त्यानंतर  भाजपची गोची होत असल्यानं राज्यपालांवर कारवाई होईल अशी चर्चाही गेल्या अनेक महिन्यांपासून होती. त्यात अखेर साडेतीन वर्षांनी कोश्यारींना राज्याच्या राज्यपाल पदावरून पदमुक्त केले गेले आहे. त्यामुळं विरोधकांकडून निर्णयाचे स्वागत केले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Bhagat Singh Koshyari : अखेर कोश्यारींची उचलबांगडी! 3 वर्ष, 5 महिने आणि 12 दिवसांचा प्रवास संपला 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bhaskar Jadhav On Nana Patole : Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचितABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
Embed widget