एक्स्प्लोर

Shiv Sena : ठाकरे यांना धक्का देणारा सादिक अली खटला आहे तरी काय?

Shiv Sena : निवडणूक आयोगात ठाकरे विरुद्ध शिंदे यांच्या लढाईत सादिक अली खटला महत्त्वाचा ठरला. नेमका हा खटला होता तरी काय?

Shiv Sena : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना पक्ष (Shiv Sena) आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील गटाला दिले. पक्षावरील दावा आणि निवडणूक चिन्हाबाबत निवडणूक आयोगासमोर सुनावणी झाली.  या सुनावणीत शिंदे गटाकडून सातत्याने सादिक अली (Sadiq Ali Case) प्रकरणाचा दाखला देण्यात आला होता. सादिक अली खटला नेमका आहे तरी काय, हे जाणून घ्या...

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पश्चात काँग्रेस पक्षातील गटबाजी दिसू लागली होती. नेहरू यांच्यानंतर पंतप्रधानपदाची सूत्रे लालबहाद्दूर शास्त्री यांच्या हाती गेली. मात्र, शास्त्री यांच्या निधनानंतर एका गटाने इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांना नेतृत्वासाठी पुढे आणले. 1967 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला यश मिळाले. मात्र, या निवडणुकीत विरोधी पक्षाची कामगिरी लक्षणीय होती. इंदिरा गांधी यांना पंतप्रधानपदी बसवणाऱ्या सिंडिकेट गटामध्ये (Congress Syndicate) इंदिरा यांच्याविरोधात नाराजी पसरू लागली होती. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद उफाळून आले. सिंडिकेट गटाने नीलम संजीव रेड्डींना काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी दिली. तर, इंदिरा गांधी यांनी उपराष्ट्रपती व्ही.व्ही. गिरी यांना अपक्ष म्हणून उमेदवारी दिली आणि व्ही. व्ही. गिरी यांना निवडून आणले. 

या घटनेमुळे काँग्रेसमध्ये फूट पडली. काँग्रेस इंदिरा आणि काँग्रेस सिंडिकेट असे दोन गट झाले. या वादामुळे काँग्रेसचे निवडणूक चिन्ह बैलजोडी कोणाला द्यायचे असा वाद निर्माण झाला होता. हा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहचला. 
 
सर्वोच्च न्यायालयात काँग्रेस पक्ष संघटनेचे अध्यक्ष सादिक अली आणि इंदिरा गांधी यांच्या वर्चस्वाखालील संसदीय पक्ष असा खटला होता. या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने इंदिरा गांधी यांच्या नेतृत्त्वातील पक्ष खरा असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यामुळे इंदिरा गांधी यांच्या गटाला गाय आणि वासरू हे चिन्ह देण्यात आले. या खटल्यात इंदिरा गांधी यांच्या बाजूने अधिक संख्याबळ असल्याचा मुद्दा लक्षात घेण्यात आला होता. 

निवडणूक आयोगाच्या 1968 च्या चिन्हाबाबतच्या आदेशानुसार, एखाद्या पक्षात फूट पडली असल्याचे निवडणूक आयोगाच्या लक्षात आल्यानंतर निवडणूक आयोग विविध माहिती जमा करते. मूळ पक्ष कोणता याचा निर्णय घेताना संसदेतील संख्याबळ, त्यातील बहुमताचा आकडा हा महत्त्वाचा ठरतो. 

एकनाथ शिंदे यांच्या प्रकरणातही आमदार, खासदारांची संख्या निर्णायक ठरली असल्याचे निवडणूक आयोगाच्या आदेशातून दिसत आहे. 

इंदिरा गांधींना आव्हान देणारे सादिक अली कोणे होते? (Who is Sadiq Ali)

सादिक अली हे मूळचे स्वातंत्र्यसैनिक होते. विद्यार्थी दशेपासून ते स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होते. काँग्रेसमध्ये सादिक अली सक्रिय होते. काँग्रेसमध्ये त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. सादिक अली हे 1971-1973 या कालावधीत ही ते काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
Maharashtra Live News Updates: सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूची होणार उच्चस्तरीय चौकशी, नाशिक आणि नागपूरची पथके आश्रमशाळेची पाहणी करणार
Maharashtra Live News Updates: सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूची होणार उच्चस्तरीय चौकशी, नाशिक आणि नागपूरची पथके आश्रमशाळेची पाहणी करणार

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
Ranchi Student Protest : रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
Embed widget