PM Narendra Modi In Dehu: वारकऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कोणत्या आपेक्षा आहेत?
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर आहेत. संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचं लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. याच दौऱ्यादरम्यान वारकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे अनेक मागण्या केल्या आहे
PM Narendra Modi In Dehu: पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर आहेत. संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचं लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. याच दौऱ्यादरम्यान वारकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे अनेक मागण्या केल्या आहे. शिळा मंदिराचं लोकार्पण मोदींच्या हस्ते व्हावं, अशी ईच्छा विश्वस्तांनी व्यक्त केली होती. त्यासाठी मोदींही होकार दिला होता. याच शिळा मंदिराच्या लोकार्पणासाठी मोदी देहूत येणार आहेत.
नमामी चंद्रभागा, नमामी गंगा जशी झाली तशीच नमामी इंद्रायणी व्हावी. वारकरी साप्रदायातील सगळे तीर्थक्षेत्र हे सुधारावे, त्यासाठी वेगळं प्रधिकरण स्थापन करावं . ज्यामुळे ही सगळी तीर्थक्षेत्र या प्रधिकरणाअंतर्गत येतील. यासाठी सगळ्या पायाभूत सुविधा पंतप्रधानाकडून पुरविण्यात याव्या, अशी मागणी विश्वस्थांनी केली आहे.
ज्याप्रमाणे काशीचा विकास झाला. अयोध्येचा विकास होत आहे. तसाच विकास भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या तीर्थक्षेत्राचा व्हायला हवा. वारकरी सांप्रदयाची जी धर्मिक आणि पवित्र धर्मस्थळं आहेत. याचा सर्वांगिण विकास व्हावा, अशा अपेक्षादेखील विश्वस्थांनी व्यक्त केल्या आहेत. तुकोबांचं जीवन कार्य समता, बंधुता, एकात्मता यासाठी खर्च झालं. वारकरी सांप्रदयाच्या मार्गाने वाटचाल करत सगळ्या जगासमोर मोठा आदर्श ठेवला, असंही ते म्हणाले.
वारीचा मार्गाचा विकास होणं गरजेचं आहे.
अनेक ठिकाणी वारी मार्गाचं चौपदरीकरणाचं काम सुरु आहे. वारकऱ्यांच्या विसाव्याच्या स्थळांमध्ये सुधारणा करण्यात यावी. या मार्गावर वारकऱ्यांना सगळ्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्या. पालखी तळ पुर्ण विकसित होण्याची गरज आहे, अशी मागणी देखील वारकरी सांप्रदायाकडून केली जात आहे.
दरम्यान, उद्या (14जून) पंतप्रधान यांचा वारकऱ्यांशी संवाद होणार आहे. दुपारी 2 वाजताच्या सुमारास त्यांची सभा होईल यावेळी मोदी नेमकं काय संबोधित करणार? वारकऱ्यांच्या कोणत्या मागण्या पुर्ण करणार?, याकडे संपुर्ण वारकरी सांप्रदायाचं लक्ष लागलं आहे.
मोदींच्या दौर्यामुळे देहू परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे. स्वच्छता व सुरक्षिततेच्या दृष्टीने मुख्य मंदिर दर्शनासाठी बंद ठेवले आहे. मंदिर परिसरात पास धारकांनाच प्रवेश दिला जात आहे.