एक्स्प्लोर

Weather : विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम, उत्तर भारतात थंडीपासून दिलासा

उत्तर महाराष्ट्रासह पुणे, नाशिक, नागपूर, जालना या ठिकाणी आणखी थंडीची लाट आहे. अन्य ठिकाणी राज्यात थंडीपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

India Weather Update : उत्तर भारतात हवामानात बदल होत आहे. एकीकडे दिल्ली, पंजाब, हरियाणामध्ये सूर्यप्रकाशामुळे थंडीपासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशातील काही शहरांमध्ये धुक्यामुळे थंडीची लाट कायम आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीतील लोकांना बदलत्या हवामानामुळे भेडसावणाऱ्या समस्यांपासून सुटका मिळू शकते, कारण येत्या आठवड्याच्या शेवटपर्यंत हवामानात कोणताही बदल होणार नाही. मात्र, पुढील आठवड्यापासून कमाल आणि किमान तापमानात वाढ होणार असल्याने थंडीपासून दिलासा मिळणार आहे. दरम्यान, राज्यात गारठा कमी झाला आहे. उत्तर महाराष्ट्रासह पुणे, नाशिक, नागपूर, जालना या ठिकाणी आणखी थंडीची लाट आहे. अन्य ठिकाणी राज्यात थंडीपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

महारष्ट्रात तापमानात चढ उतार होत असल्याची स्थिती आहे. उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात किमान तापमनात घट झाली आहे. राज्याच्या दक्षिण भागात मात्र, उन्हाचा चटका कायम आहे. त्यामुळे तिथे थंडीपासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. उत्तरेकडील वाहणाऱ्या वाऱ्यामुळे राज्यातील काही भागात थंडी कायम असल्याचे चित्र दिसत आहे.

दरम्यान, हिमाचल प्रदेशमध्ये 14 फेब्रुवारीपर्यंत हवामान स्वच्छ राहण्याचा अंदाज आहे. मात्र, 15 फेब्रुवारीला पुन्हा एकदा बर्फवृष्टी होऊन थंडी वाढू शकते. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या हिमवृष्टीमुळे अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. येत्या काही दिवसांत बिहारमधील लोकांनाही थंडीपासून दिलासा मिळेल, असे हवामान विभागाने म्हटले आहे. बिहारमध्ये आज सूर्यप्रकाश राहणार आहे. आज राज्यात कमाल तापमान 20 तर किमान तापमान 8 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये लोकांना सूर्यप्रकाश पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर तिथे पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवली आहे. आज उत्तर प्रदेशमध्ये कमाल तापमान 21 आणि किमान तापमान 8 अंश सेल्सिअस राहणार आहे.  बंगालमधील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानात चढउतार होण्याची प्रक्रिया सुरू आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हिवाळ्यात पावसाने हजेरी लावली. त्याचवेळी, हवामानाचा मूड बदलला आहे. राज्यात आज लख्ख सूर्यप्रकाश असेल. त्याचबरोबर वाऱ्यामुळे थंडीचा कडाका कायम राहणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Girish mahajan latur water: ...तर लातूरला पुन्हा रेल्वेने पाणी पुरवठा होऊ शकतो; मंत्री गिरीश महाजनांचं अमित देशमुखांना प्रत्युत्तर
...तर लातूरला पुन्हा रेल्वेने पाणी पुरवठा होऊ शकतो; मंत्री गिरीश महाजनांचं अमित देशमुखांना प्रत्युत्तर
Gokul : गोकुळच्या दूध दरात 6 रुपयांची वाढ, प्रशासक काळातील तोटा भरुन काढण्यासाठी ग्राहकांच्या माथी दरवाढ, शेतकऱ्यांची मात्र तीन रुपयांवर बोळवण
गोकुळच्या दूध दरात 6 रुपयांची वाढ, प्रशासक काळातील तोटा भरुन काढण्यासाठी ग्राहकांच्या माथी दरवाढ, शेतकऱ्यांची मात्र तीन रुपयांवर बोळवण
Satej Patil on Gokul milk Rate : म्हैस दूध 6 रुपये, गाय दूध 4 रुपयांनी महागलं; आजपासून दरवाढ लागू, सतेज पाटलांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले....
म्हैस दूध 6 रुपये, गाय दूध 4 रुपयांनी महागलं; आजपासून दरवाढ लागू, सतेज पाटलांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले....
बीडमध्ये शैक्षणिक वर्तुळात खळबळ, बोगस भरती झालेल्या 73 शिक्षकांची सेवा समाप्त, नोकरी कायमची गमावली
बीडमध्ये शैक्षणिक वर्तुळात खळबळ, बोगस भरती झालेल्या 73 शिक्षकांची सेवा समाप्त, नोकरी कायमची गमावली

व्हिडीओ

Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: पैसे मागितले, काही उर्दुमध्ये बोलत होते; कुर्ला तरुण-तरुणी मारहाण प्रकरणावर प्रत्यक्षदर्शी महिलेची धक्कादायक माहिती, VIDEO
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण-तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव
Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul : गोकुळच्या दूध दरात 6 रुपयांची वाढ, प्रशासक काळातील तोटा भरुन काढण्यासाठी ग्राहकांच्या माथी दरवाढ, शेतकऱ्यांची मात्र तीन रुपयांवर बोळवण
गोकुळच्या दूध दरात 6 रुपयांची वाढ, प्रशासक काळातील तोटा भरुन काढण्यासाठी ग्राहकांच्या माथी दरवाढ, शेतकऱ्यांची मात्र तीन रुपयांवर बोळवण
Satej Patil on Gokul milk Rate : म्हैस दूध 6 रुपये, गाय दूध 4 रुपयांनी महागलं; आजपासून दरवाढ लागू, सतेज पाटलांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले....
म्हैस दूध 6 रुपये, गाय दूध 4 रुपयांनी महागलं; आजपासून दरवाढ लागू, सतेज पाटलांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले....
Girish mahajan latur water: ...तर लातूरला पुन्हा रेल्वेने पाणी पुरवठा होऊ शकतो; मंत्री गिरीश महाजनांचं अमित देशमुखांना प्रत्युत्तर
...तर लातूरला पुन्हा रेल्वेने पाणी पुरवठा होऊ शकतो; मंत्री गिरीश महाजनांचं अमित देशमुखांना प्रत्युत्तर
Gold Silver Rate: 48 तासांत सोन्याचे दर 7 हजारांनी घसरले, चांदीची किंमतही 10 हजार रुपयांनी कमी; जानेवारीपासून पुन्हा तेजी येण्याचा अंदाज, घसरणीमागची कारणंही समोर
48 तासांत सोन्याचे दर 7 हजारांनी घसरले, चांदीची किंमतही 10 हजार रुपयांनी कमी; जानेवारीपासून पुन्हा तेजी येण्याचा अंदाज, घसरणीमागची कारणंही समोर
बीडमध्ये शैक्षणिक वर्तुळात खळबळ, बोगस भरती झालेल्या 73 शिक्षकांची सेवा समाप्त, नोकरी कायमची गमावली
बीडमध्ये शैक्षणिक वर्तुळात खळबळ, बोगस भरती झालेल्या 73 शिक्षकांची सेवा समाप्त, नोकरी कायमची गमावली
Kurla Phoenix Mall Mumbai News: मुंबईत तरुण-तरुणीला दगड, बेल्ट, लाकडाने मारहाण; आता धक्कादायक कारण आलं समोर, प्रत्यक्षदर्शी महिलेनेही सांगितली हादरवणारी माहिती
मुंबईत तरुण-तरुणीला दगड, बेल्ट, लाकडाने मारहाण; आता धक्कादायक कारण आलं समोर, प्रत्यक्षदर्शी महिलेनेही सांगितली हादरवणारी माहिती
साताऱ्यातील पंप्ड स्टोरेज प्रकल्पाला दुहेरी दणका; प्रदूषण नियंत्रण मंडळाकडूनही काम बंदचे निर्देश, वन्यप्रेमींचा विरोध वाढला
साताऱ्यातील पंप्ड स्टोरेज प्रकल्पाला दुहेरी दणका; प्रदूषण नियंत्रण मंडळाकडूनही काम बंदचे निर्देश, वन्यप्रेमींचा विरोध वाढला
Rajasthan Panchayat Election Results 2026 : राजस्थानच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी; सत्ताधारी भाजपाचा मोठा पराभव, ग्रामीण भागात काँग्रेसची पकड पुन्हा मजबूत
राजस्थानच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी; सत्ताधारी भाजपाचा मोठा पराभव, ग्रामीण भागात काँग्रेसची पकड पुन्हा मजबूत
Embed widget