Petrol Diesel Price Today : कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ कायम, जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर
Petrol Diesel Price Today : आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही महत्त्वपूर्ण बदल झालेला नाही, चला जाणून घेऊया आज मुंबईसह महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरांमध्ये इंधन किती दरात उपलब्ध आहे.
Petrol Diesel Price Today : सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे आजचे दर (Petrol Diesel Price Today) जाहीर केले आहेत. आजही इंधनाचे दर बदललेले नाहीत. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. म्हणजेच आजही भाव स्थिर आहेत. मात्र, पेट्रोल 100 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात असलेल्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचा समावेश आहे. चला जाणून घेऊया मुंबई, पुणे ते नाशिकसह राज्यातील सर्व प्रमुख शहरांमध्ये आज इंधनाचे दर काय आहेत.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर
मुंबई शहर - पेट्रोल 109.98 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लिटर
बृहन्मुंबई - पेट्रोल 110.13 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.29 रुपये प्रति लिटर
ठाणे - पेट्रोल 109.51 रुपये तर डिझेल 92.28 रुपये प्रति लिटर
पुणे - पेट्रोल 109.64 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.42 रुपये प्रति लिटर
नाशिक - पेट्रोल 109.86 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.65 रुपये प्रति लिटर
नागपूर - पेट्रोल 110.30 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 93.09 रुपये प्रति लिटर
कोल्हापूर - पेट्रोल 110.53 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 93.32 रुपये प्रति लिटर
अहमदनगर - पेट्रोल 109.93 रुपये तर डिझेल 92.72 रुपये प्रति लिटर
अमरावती - पेट्रोल 111.14 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 93.90 रुपये
निवडणुकांनंतर पेट्रोल-डिझेलचे भाव वाढणार ?
कच्च्या तेलाच्या भावात 2014 सालानंतर पहिल्यांदाच मोठी वाढ झाली आहे. भारताला याचा फटका बसण्याची शक्यता आहे. निवडणुकांनंतर भारतातील पेट्रोल-डिझेलचे भाव मोठ्या प्रमाणात वधारण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन युक्रेनवर येत्या आठवड्यात आक्रमण करण्याचे आदेश देतील, असा दावा व्हाईट हाऊसने केला आहे. त्यामुळे कच्च्या तेलाचे भाव वधारले आहेत.