एक्स्प्लोर

आम्ही फडणवीसांना राजकारणात आणलं : नितीन गडकरी

नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या गोर बंजारा मेळाव्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाला राज्याच्या कानाकोपऱ्यातून बंजारा बांधव उपस्थित होते.

नागपूर: मी आणि मुख्यमंत्री घराणेशाहीपासून दूर आहोत, असं केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी म्हणाले. ते नागपुरात बोलत होते. राजकारणात येण्याआधी अनेकजण समाजाच्या विकासाच्या गोष्टी करतात. पण एकदा निवडून आले की बहुतेकजण समाजाला विसरतात. मग घराणेशाही सुरु होते, असं गडकरी म्हणाले. मात्र या सगळ्या घराणेशाहीपासून मी आणि मुख्यमंत्री दूर आहोत. कारण त्यांची मुलगी लहान आहे आणि माझ्या कुटुंबात कोणीही राजकारणात येण्यास इच्छुक नाही, असं गडकरींनी नमूद केलं. नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या गोर बंजारा मेळाव्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाला राज्याच्या कानाकोपऱ्यातून बंजारा बांधव उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांचे वडील राजकारणात होते. मात्र त्यांनी मुलाला राजकारणात आणलं नाही. तर आम्ही त्यांच्या वडिलांना विनंती करुन देवेंद्र यांना राजकारणात आणलं, असंही नितीन गडकरी यांनी सांगितलं. गडकरी नेमकं काय म्हणाले? देवेंद्र फडणवीसांच्या वडिलांच्या नेतृत्त्वात मी काम केलं. त्यांच्या आई-वडिलांनी मला सांगितलं नव्हतं की माझ्या मुलाला तिकीट द्या. त्यांच्या घरी मी आणि छोटू भय्या नारकर म्हणून आमचे कार्यकर्ते होते, दोघे मिळून गेलो होतो. वडील आजारी होते. मी त्यांना सांगितलं की देवेंद्रला राजकारणात पाठवा. आम्हाला त्यांना महापालिकेचं तिकीट द्यायचं आहे. त्यावर ते म्हणाले मला काही अडचण नाही, पण त्यांच्या आईला आणि स्वत: देवेंद्रला विचारा. त्यांची तयारी असेल तर त्यांनी जावं.  त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे वडील आमदार होते म्हणून तिकीट मिळालं नाही. तर जनता, कार्यकर्ते आणि पक्ष त्यांच्या घरी गेले आणि देवेंद्र फडणवीस यांना राजकारणात आणलं. अशी परिस्थिती राजकारणात असेल तर चालेल, पण केवळ आई-वडील राजकारणात कोणत्या पदावर आहेत म्हणून मुलाला तिकीट द्यावं हे चालणार नाही. तिकीट हे समाजाने मागावं, जनतेने मागावं, असं गडकरी म्हणाले. लोक निवडून येईपर्यंत समाजाचं नाव घेतात, निवडून आल्यानंतर माझ्या मुलाला, मुलीला तिकीट द्या म्हणतात. पण मी आणि देवेंद्र सुखी आहे, देवेंद्रची मुलगी लहान आहे आणि माझ्या कुटुंबातील कोणीही तिकीट मागायला येणार नाही. कारण माझा घराणेशाहीला विरोध आहे. पण याचा अर्थ कोणाचा मुलगा असणं गुन्हा नाही. सुधाकरराव नाईकांना वसंतराव नाईकांमुळे संधी मिळाली, पण सुधाकररावांमध्येही कर्तृत्त्व होतं. त्यानंतर मनोहर नाईकांनाही संधी मिळाली, त्यांचंही कर्तृत्व होतं. त्यानंतर आता नील नाईकांना संधी मिळाली. याचं कारण ते केवळ नाईक घराण्यातील आहेत असं नाही, तर त्यांचं कार्य, कर्तृत्व आणि क्षमता बघून त्यांना संधी मिळाली आहे, असं नितीन गडकरींनी नमूद केलं.

महत्त्वाच्या बातम्या

MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
नाशिककरांसाठी पुढचे चार ते पाच तास महत्वाचे, 500 मिलीमीटर पाऊस पडण्याचा इशारा, NDRF च्या टीम तैनात
नाशिककरांसाठी पुढचे चार ते पाच तास महत्वाचे, 500 मिलीमीटर पाऊस पडण्याचा इशारा, NDRF च्या टीम तैनात
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget