एक्स्प्लोर

पाणीप्रश्न पेटला, बीड आणि लातुरातील राजकारणी आमने-सामने

केजच्या आमदार संगिता ठोंबरे यांनी एका रात्रीतून जलसंपदा मंत्र्यांच्या माध्यमातून लातूर एमआयडीसीला होणारा पाणीपुरवठा बंद करून लातूरकरांच्या तोंडचे पाणी पळिवले होते.

लातूर : दोन दिवसांपूर्वी येथील औद्योगिक वसाहतीसाठी मांजरा धरणाहून होणारा पाणी पुरवठा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या आदेशावरुन बंद करण्यात आला होता. मात्र, हा पाणीपुरवठा लातूरच्या राजकारण्यांनी पूर्ववत करुन घेतला आहे. परंतु, शनिवारी सकाळी धनेगाव धरणावर बीड येथील संभाजी ब्रिगेडच्या वतीने आंदोलन करून हा पाणी पुरवठा बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. शेतीसाठी बांधण्यात आलेल्या धरणातून उद्योगासाठी पाणीपुरवठा कसा असा सवाल उपस्थित करण्यात आल्याने खऱ्या अर्थाने पाणीप्रश्न पेटला आहे. केजच्या आमदार संगिता ठोंबरे यांनी एका रात्रीतून जलसंपदा मंत्र्यांच्या माध्यमातून लातूर एमआयडीसीला होणारा पाणीपुरवठा बंद करून लातूरकरांच्या तोंडचे पाणी पळिवले होते. त्यामुळे लातूरसह औसा येथील जवळपास 800 उद्योगधंदे अडचणीत आले होते. हा प्रश्न प्रतिष्ठेचा करून पालकमंत्री संभाजी पाटील यांनी शुक्रवारी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठका घेतल्या आणि रात्रीच  पाणीपुरवठा सुरळीत करून घेतला. शनिवारी सकाळी 10 पर्यंत पाणी सुरळीत पाणीपुरवठाही झाला. मात्र, केज, अंबाजोगाई येथील शेतीचे पाणी बंद करून लातूर एमआयडीसीला पाणीपुरवठा कसा केला जातो म्हणून संभाजी ब्रिगेडच्या वतीने आंदोलन करण्यात आले. बीडच्या क्षेत्रात असणाऱ्या धरणातील पाण्याचा वापर लातूरच्या एमआयडीसीला होतो, हे अन्यायकारक असल्याचे मत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे. शेतीला नाही तर उद्योगधंद्यासाठीही अशी भूमिका घेऊन शनिवारी सकाळी आंदोलन करण्यात आले आहे. पाणीप्रश्न पेटला असल्याने सोमवारी बीड, उस्मानाबाद व लातूर येथील जिल्हाअधिकाऱ्यांची बैठक होणार असून यामध्येच योग्य तोडगा निघणार असल्याचे संकेत लातूर जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. एकंदरीत धरण मृतसाठ्यात असले तरी राजकीय अस्तित्व दाखवून देण्याचा प्रयत्न बीड, लातूर येथील लोकप्रतिनीधींकडून होत आहे. त्यामुळे सध्या तरी एमआयडीसीचा पाणी पुरवठा सुरू करण्यात आला असला तरी तो किती काळापर्यंत टिकेल याबाबत साशंका आहे.

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी,
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी, "तुझा नेक्स्ट गेम" म्हणत पाठवला मेसेज, कुटुंबीय भीतीच्या छायेत

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
Abhijeet Dipke: सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
Gokul Election: कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा थेट व्हिडिओ व्हायरल
कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा व्हिडिओ व्हायरल
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
Embed widget