एक्स्प्लोर

शेतकऱ्यांचा आनंद ठरला औट घटकेचा; धनादेश मिळाले मात्र मुदत गेल्याने वठले नाही

वाशीम जिल्ह्यातील हिवरा गणपती गावातील शेतकऱ्यांना बजाज एलायंस कंपनीचे धनादेश आले होते. मात्र, मुदत संपून गेल्याने एकही चेक वटला नाही. विशेष म्हणजे हे धनादेश कशाचे याची माहिती एकाशी शेतकऱ्याला सांगता आली नाही.

वाशीम : देव येतो द्यायला मात्र, पदर नाही घ्यायला, अशी एक म्हण ग्रामीण भागात आहे. हीच म्हण काही वाशिमच्या हिवरा गणपती गावातील शेतकऱ्यांसोबत खरी ठरली आहे. या गावात काही शेतकऱ्यांना एखादी लॉटरी लागल्या सारखी धनादेश पोस्टाद्वारे घरी मिळाले. लॉकडाऊनच्या काळात हे धनादेश मिळाल्याने शेतकरी आनंदी झाले. मात्र, त्यांचा हा आनंद काही जास्त काळ टिकला नाही.

वाशीम जिल्ह्यातील नवसाला पावणाऱ्या गणपती मंदिरामुळे हिवरा गणपती गावाची जिल्ह्यात ओळख आहे. गावात अधिकतर शेतकरी कुटुंब राहतात. लॉकडाऊनच्या काळात हाताला काम नसल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांकडे खरीप हंगामाची पेरणी करायला पैसे नसल्यामुळे पेरणी करणे कठीण झाले होते. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी कर्ज काढून पेरणी केली. मात्र, बोगस बियाणं शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आणि या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली. आता पैसे कुठून आणायचे आणि दुबार पेरणी कशी करायची असा प्रश्न या शेतकऱ्यांना पडला होता.

बोगस बियाणे प्रकरण, कृषी सहसंचालक 13 तारखेला सुनावणीला हजर न झाल्यास अटक करून हजर करा : औरंगाबाद खंडपीठ

अशातच दारात पोस्टमन उभा राहतो आणि हातातील लिफाफा देतो. जवळपास तीस शेतकऱ्यांना हे लिफाफे दिले जातात. या लिफाफ्यामध्ये उघडून पाहिले तर बजाज एलायंस कंपनीचे धनादेश. संकट काळी धनादेश पाहून लॉटरी लागल्या सारखा आनंद शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. मात्र, हे धनादेश नेमके आहेत तरी कशाचे हे या शेतकऱ्यांना माहित नाही. तरी, आनंदी झालेले शेतकरी थोडाही विलंब न करता धनादेश वटवण्यासाठी तयारीला लागतात.

शेतकऱ्यांचा हिरमोड 

विश्वनाथ अरसोडच्या मते धनादेश पाहून आनंद झाला. मात्र बँकेत गेल्यानंतर चेक वठणार नाही, असं सांगितल्याने हिरमोड झाला. विश्वनाथ यांना काही फायनान्स काढल होत का? विमा काढला होता का? विचारल्यावर त्यांच्या मते हे काढण्यासाठी वेळ मिळाला नाही. अशोक देशमुख यांच्या मते बँकेत धनादेश वठवण्यासाठी गेल्यावर मुदत गेल्याचं समजले आणि थेट बजाज फायनान्सचं कार्यायलय गाठलं. मात्र, हे धनादेश कशाचे याची माहिती घरी कुणालाही सांगता आली नाही.

बजाज कंपनीकडून आलेले धनादेशावर 9 मार्च 2020 तारीख आहे. कोविड 19 मुळे सुरू असलेल्या लॉकडाऊन काळात वाहतूक व्यवस्था बंद होती. काही दिवस वैध असणारे धनादेश मुदतीनंतर शेतकऱ्यांपर्यंत पोहचले. आता हे धनादेश नेमके आहेत तरी कशाचे? मुदत बाह्य झालेल्या ह्या धनादेशाची रक्कम या शेतकऱ्यांना मिळून नवसाला पावणारे गणपती बाप्पा या शेतकऱ्यांना पावेल का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Sheti Jagat | शेती जगत : राज्यातील कानाकोपऱ्यातील शेतीची खबरबात; पावसामुळे शेतीकामाला वेग

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
Embed widget