Wardha : मराठी साहित्य संमेलनाचे उद्धाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तर समारोप करणार उपमुख्यमंत्री
Wardha sahitya sammelan : 96 व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Wardha sahitya sammelan 2023 : वर्ध्यात होणाऱ्या 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ( Marathi Sahitya Sammelan) तयारीला वेग आला आहे. वर्ध्याच्या स्वावलंबी मैदानावर होत असलेल्या या संमेलनाचे उद्धाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर असणार आहेत. स्वागताध्यक्ष माजी खासदर दत्ता मेघे (Datta Meghe) तर प्रमुख अतिथी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची उपस्थिती राहणार आहे. प्रसिद्ध हिंदी साहित्यिक विश्वनाथ प्रसाद तिवारी, हिंदी कवी डॉ. कुमार विश्वास हे देखील उपस्थित राहणार आहे. समेलनाचे अध्यक्षीय भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहेय. तत्पूर्वी सकाळी शहरात ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. सकाळी 10 वाजून 10 मिनिटांनी वर्धा गौरवगीत सादर केले जाईल त्यांनतर अ. भा. साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाणार आहे.
दुपारच्या सत्रात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराज आणि महाराष्ट्राची प्रबोधन परंपरा यावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. आचार्य विनोबा भावे सभामंडप, मनोहर म्हैसाळकर सभामंडप अशा ठिकाणी 4 फेब्रुवारी रोजी कथाकथन, परिसंवाद, मुक्त संवाद व कवी संमेलन होणार आहे. कृषी, अर्थ विषक लेखन, मराठी साहित्य आणि अनुवादन असे विविध विषय परिसंवादात उमटणार आहे. 5 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या समारोप कार्यक्रमापूर्वी परिसंवाद होईल त्यांनतर समारोप करण्यात येणार आहे. समारोप कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नामदार दीपक केसरकर, नामदार सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहणार आहे. 3 ते 5 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या या साहित्य संमेलनात गझल कट्टा, बाल साहित्य कट्टा, कवी कट्टा, वाचन मंच या सारख्या कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
- भव्य ग्रंथ दालन ठरणार आकर्षण
वर्ध्याच्या स्वावलंबी मैदानावर 3 ते 5 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या या साहित्य संमेलनासाठी महात्मा गांधी साहित्य नगरी सज्ज झाली आहे. येथूनच चारशे मीटर अंतरावर स्वावलंबी शाळेचे प्रांगण आहे, या प्रांगणात 1969 मध्ये 48 वे साहित्य संमेलन पार पडले होते. वर्ध्याच्या स्वावलंबी मैदानावर सुरू असलेल्या तयारीत टीम वर्क केले जात आहे, हेच जाणून घेण्यासाठी सभामंडप, ग्रंथदालन व मैदानावरील नियोजनात प्रत्यक्ष सहभाग असणाऱ्या उपअभियंता व सभामंडप समन्वयक महेश मोकलकर यांच्याशी आमचे प्रतिनिधी एकनाथ चौधरी यांनी बातचीत केली आहे. महेश मोकलकर यांनी साहित्य संमेलनाच्या तयारीबाबत माहिती दिली.