Wardha News Update : वर्ध्यातील सावंगी परिसरातील आदित्य रेसिडन्सी येथील फ्लॅटला आग लागून मोठे नुकसान झाले. देवघरातील दिव्यामुळे ही आग लागली असल्याची शक्यता प्रत्यक्षदर्शी नागरिकांकडून वर्तवण्यात येत आहे. या घटनेत प्लॅटमधील दोन ते अडीच लाख रूपयांच्या साहित्याचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे.
सांवगी परिसरातील आदित्य रेसिडेन्सीमधील पहिल्या मजल्यावरील 105 क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये मंगेश ढवळे हे भाडेतत्वावर राहतात. ते पुलगाव येथील मुळ रहिवासी असून भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झाले असल्याची माहिती आहे. सध्या यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथे अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून ते कार्यरत आहेत. कामानिमित्त त्यांच्या कुटुंबातील सर्वच जण बाहेरगावी गेले होते. यावेळी त्यांच्या बंद फ्लॅटमध्ये आग लागली. गुरुवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे.
सुदैवाने या आगीत कोणालाही दुखापत झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच वर्धा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवली. परंतु, प्लॅटमधील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे.
गुरुवारी सकाळी ढवळे हे परिवारासह पुलगावला गेले होते. त्यामुळे फ्लॅट बंद होता, हे नागरिकांना माहीत होते. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास त्यांच्या फ्लॅटमधून अचानक धुराचे लोळ बाहेर येताना दिसले. त्यामुळे नागरिकांनी तातडीने सावंगी पोलीस आणि वर्धा नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत ही आग आटोक्यात आणली.
महत्वाच्या बातम्या
Fire In Andhra Pradesh Factory : आंध्र प्रदेशातील केमिकल फॅक्टरीला लागलेल्या भीषण आगीत 6 ठार, 13 जण जखमी
शरद पवारांनी जेम्स लेनला महाराष्ट्रात आणून कारवाई करून दाखवावी, ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ पांडुरंग बलकवडेंचे आवाहन
Gadchiroli : सूरजागड लोहखनिज प्रकल्पात 2000 स्थानिक आदिवासींना रोजगार, युवक-युवतींना नियुक्तीपत्रे प्रदान
Supreme Court : 17 वर्षे शिक्षा भोगल्यानंतर तरुणाने स्वतःला म्हटले 'अल्पवयीन'; सर्वोच्च न्यायालयाने घेतला 'हा' निर्णय