पुणे : जेम्स लेनप्रकरावरुन सध्या राज्यातील  वातावरण तापत चालले आहे. जे हे पुस्तक लिहिण्यासाठी बाबासाहेब पुरंदरेंनी मदत केल्याचा आरोप आहे.  यासंदर्भात मनसेनं बाबासाहेब पुरंदरे यांचं एक पत्र समोर आणत शरद पवारांची टीका खोडण्याचा प्रयत्न केला आहे. जेम्स लेनच्या पुस्तकावर बंदी आणणारं पत्र पुरंदरेंनी ऑक्सफर्ड प्रकाशनला लिहिलं होतं.  त्या पत्रावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असून  जेम्स लेन अजून जिवंत आहे. शरद पवारांनी जेम्स लेनला महाराष्ट्रात आणावे आणि त्याच्यावर कारवाई करून दाखवावी, असे आवाहन पांडुरंग बलकवडे यांनी केले आहे. 


पांडुरंग बलकवडे म्हणाले, जेम्स लेन हा ख्रिश्चन मशिनरी होता. जेम्स लेनने त्याच्या पुस्तकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदुत्ववाद्यांवर टीका  केलीय. जेम्स लेन अजून जिवंत आहे. शरद पवारांनी जेम्स लेनला महाराष्ट्रात आणावे आणि त्याच्यावर कारवाई करून दाखवावी त्यासाठी राज्य सरकारने ठराव करून तो केंद्र सरकारला पाठवावा. 


जेम्स लेनने पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेत येऊन केलेलं लिखाण विकृत आहे.  जेम्स लेनने या पुस्तकामध्ये भांडारकर संस्थेतील व्यक्ती आणि बाबासाहेब पुरंदरेंचे आभार मानले असले तरी त्यांचा लेनने केलेल्या लिखाणाशी काहीही संबंध नाही. बाबासाहेब पुरंदरेंसह पुण्यातील सात इतिहास संशोधकांनी जेम्स लेनच्या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी करणारं पत्र 10 नोव्हेंबर 2003 ला ऑक्सफर्ड इंडिया प्रेस या जेम्स लेनचे पुस्तक प्रकाशित करणाऱ्या संस्थेला लिहलं. 21 नोव्हेंबरला ऑक्सफर्ड इंडिया प्रेस या संस्थेकडून जेम्स लेनने केलेल्या लिखाणाबद्दल माफी मागणारं पत्र लिहिलं.  मात्र त्यावेळी जेम्स लेनच्या पुस्तकावर बंदी घालण्यासाठी न्यायालयात बाजू मांडणाऱ्या तत्कालीन राज्य सरकारने हे पत्र न्ययालयात मांडलं नाही. त्यामुळे पुस्तकावर बंदी आली नाही .


शरद पवार आणि साम्यवादी नेते सीताराम येचुरी यांनी जेम्स लेनच्या पुस्तकातील आक्षेपार्ह्य भाग वगळल्यास ते प्रकाशित करायला आपली हरकत नाही असं म्हटलं होतं. जेम्स लेन हा साम्यवादी विचारसरणीने प्रभावित होता. मला संशय आहे की, जेम्स लेनने साम्यवादी विचारवंतांबरोबर शिवाजी महाराजांना बदनाम करण्यासाठी कट रचला होता, असेही बलकवडे  यावेळी म्हणाली.