वर्धा : पहाटे घराच्या गेटवर पिशवीसह धमकी देणारे पत्र अडकविले गेले आणि त्यामुळे आर्वीतील एका कुटुंबाचीच नव्हे तर संपूर्ण आर्वीकरांची झोप उडविणारा प्रकार घडला. चक्क घराच्या लोखंडी गेटवर पिशवीत बॉम्ब सदृश्य वस्तू ठेऊन धमकीचे पत्र देखील चिटकविण्यात आले. यानंतर पोलिसांनी कारवाई देखील केलीय. पण हा प्रकार नेमका कुणी केला? या चर्चेने सध्या आर्वी शहरात (Wardha Arvi Bomb Story) जोर धरला आहे. मुला-मुलीचे साक्षगंध झाल्यावर या लग्नाला विरोध करणाऱ्या प्रेमविराने हा अफलातून प्रकार केल्याचे अडकवलेल्या पत्रातून स्पष्ट होत आहे. याला पोलिसांनी देखील दुजोरा दिलाय.
हात लावू नका अन्यथा स्फोट होईल
वर्ध्याच्या आर्वी येथे विठ्ठल वॉर्ड परिसरात घराच्या लोखंडी गेटवर एका पिशवीत संशयास्पद वस्तू अडकवून ठेवल्याचे आढळल्याने खळबळ उडाली होती. सकाळी जेव्हा कुटुंबीयांनी गेट उघडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना पिशवी अडकवलेली दिसली. पिशवीतून येणारा टिकटिक असा आवाज देखील घाबरवून सोडणारा होता. चिट्ठीवर मोठ्या अक्षरात लिहिलेल्या मजकुराने तर झोपच उडविली. यात या वस्तूला हात लावू नका अन्यथा स्फोट होईल, असा मचकूर होता.
पोलिसांकडून सदर वस्तू डिफ्युज
सदर प्रकाराची पोलिसांना माहिती देण्यात आली. आर्वी पोलिसांकडून बॉम्ब शोधक पथकाला पाचारण करून पथकाच्या सहाय्याने सदर पिशवी ताब्यात घेतली. त्यात एक बॅटरी, पिवळ्या रंगाची पावडर, टिकटिक आवाज करणारी घड्याळं आणि वायर आढळून आले. पोलिसांकडून सदर वस्तू डिफ्युज करण्यात आली.
पोलीस संशयित आरोपीचा शोध घेत आहे. बॉम्ब सदृश्य वस्तूला अडकवून ठेवलेली चिठ्ठी आणि लग्न जुळलेल्या मुलाला काही दिवसांपूर्वी आलेले निनावी फोन यावरून पोलीस तपास करीत आहे.
ही बातमी वाचा: