पुणे : रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री येत्या शनिवारी बारामतीच्या दौऱ्यावरती आहे परंतु या कार्यक्रमाला निमंत्रण मिळालं नसल्याची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी दिली आहे. शरद पवारांच्या नियोजित दौऱ्यामध्ये नमो रोजगार मेळावा किंवा इतर कार्यक्रमातील अशी प्राथमिक माहिती मिळते. विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर हा कार्यक्रम पार पडणार आहे. मात्र निमंत्रण मिळालं नाही पण बोलवलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं स्वागत करायला जाणार असल्याचं सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलं आहे.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
'या रोजगार मेळाव्याचं आमंत्रण मला अजून आलं नाही आहे. मात्र या कार्यक्रमाला बोलवलं तर मी नक्की जाणार आणि राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं स्वागत करणार आहे. या परिसरातील मी लोकप्रतिनिधी असल्याने माझी नैतिक जबाबदारी आहे की मी त्यांचं स्वागत करावं आणि अतिथि देवो भवं, हे आधीपासून शिकवलं गेलं आहे. या विद्याप्रतिष्ठानच्या संस्थेत आतापर्यंत अनेक दिग्गज येऊन गेले. शरद पवारांच्या आमंत्रणानेच हे लोक इथे आले. त्यामुळे बोलवलं तर मी नक्की जाईन', असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
2 आणि 3 मार्च रोजी मेळावा
पुणे विभागातील सुशिक्षित बेरोजगार तरूणांना रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी बारामती येथे 2 व 3 मार्च रोजी आयोजित विभागस्तरीय 'नमो महारोजगार मेळाव्या'च्या पार्श्वभूमीवर शुक्रवार 1 मार्च रोजी नोकरी विषयक कौशल्ये (सॉफ्ट स्कील्स), मुलाखत तंत्र या विषयांवर मेळावापूर्व प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम 1 मार्च रोजी बारामती शहरातील शारदानगर येथील ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे आप्पासाहेब पवार सभागृहात सकाळी 10 ते 12, शिवनगर विद्याप्रसारक मंडळाचे सभागृह व विद्याप्रतिष्ठानचे गदिमा सभागृह, विद्यानगरी येथे सकाळी 10 ते 2 व श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ सभागृहात दुपारी 2 ते 4 या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. रोजगार मिळविण्यासाठी मुलाखतीला जाताना युवक-युवतींना प्रशिक्षणाचा लाभ होणार असून रोजगार इच्छुक युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
इतर महत्वाची बातमी-