Nagpur : अयोध्येत (Ayodhya) प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर तमाम रामभक्तांना रामललाचे दर्शन घेण्याची आस लागली आहे. अशातच हैदराबाद (Hyderabad) येथील दोन जादूगर दुचाकीस्वार चक्क डोळ्यांवर पट्टी बांधून बाईकने अयोध्येच्या दिशेने निघाले आहे. या प्रवासात हे दोघे तब्बल 1600 किलोमीटरचे अंतर कापणार आहेत. प्रभू श्रीरामाच्या धार्मिक भावनेचा प्रसार करण्यासाठी हे दोघे  हैदराबाद वरून अयोध्येसाठी रवाना झाले आहे. या प्रवासादरम्यान हे दोघे नागपूरात (Nagpur)पोहचले असता त्यांनी रामटेक येथे प्रभू श्री रामांचे दर्शन घेऊन पुढे कंटगी पर्यंत डोळ्यावर पट्टी बांधून पुढचा प्रवास करण्याचा निर्धार केला आहे. जादूगर मारुती जोशी आणि जादुगर रामकृष्णा असे या दोन्ही जादुगरांची नावे आहे.


डोळ्यांवर पट्टी बांधून मोटारसायकलने निघाले अयोध्येला 


श्री रामाचे मनमोहक बालस्वरूप डोळ्यासमोर ठेऊन सध्या लाखो श्रीराम भक्त दररोज अयोध्येत दाखल होत आहेत. काही जण बसने, काहीजण रेल्वेने, तर काहीजण अगदी विमानाने अयोध्येला जात आहे. मात्र हैदराबादजवळ असलेल्या शमशाबाद येथून दोन जादूगार श्रीराम दर्शनाची आस घेऊन निघाले आहेत. मात्र, त्याचा प्रवास हा जगावेगळा आहेत. दोघीही मोटारसायकलनं जरी प्रवास करत असले तरी त्यांचा प्रवास हा सामान्य नाही. हे दोन्ही रामभक्त उघड्या डोळ्यांनी नाही,  तर चक्क डोळ्यांवर घट्ट पट्टी बांधून मोटारसायकल चालवत अयोध्येला निघाले आहे. या प्रवासादरम्यान ते डोळ्यांवर पट्टी बांधून बाईकने अयोध्येचे 1600 अंतर कापणार आहेत.


नऊ दिवसात कापणार 1600 किलोमीटर अंतर 


डोळ्यावर पट्टी बांधून बाईक चालवण्याची कला प्रावीण्य मिळवण्यासाठी मारोती जोशी आणि रामकृष्ण यांनी सहा ते आठ महिने सतत सराव केला. मारुती जोशी आणि रामकृष्ण म्हणाले की, बऱ्याचदा सर्व अवयव आणि इंद्रिये नीट काम करत असताना लोक रस्त्यावर बेदरकारपणे गाडी चालवतात. त्यामुळे रस्त्यावर अनेकांचा जीव धोक्यात आला आहे. रस्त्यावर डोळे आणि कान उघडे ठेवूनही बेदरकारपणे वाहन चालवल्यास घातक परिणाम होऊ शकतात. दुसरीकडे, अंध बंधू-भगिनीही स्वत:ची किंवा इतरांची इजा न करता सुखरूपपणे त्यांच्या स्थळी पोहोचतात. यासाठी ती त्यांची प्रबळ इच्छाशक्ती आणि जन्मजात संवेदनशीलतेने त्यांना मदत करते.


त्यामुळे आपल्या बंधू-भगिनींचा आदर करणे हाच आमचा उद्देश असून डोळ्यावर पट्टी बांधून दुचाकीवरून अयोध्येला जाण्याचा निर्णय आम्ही घेतला. सोळाशे ​​किलोमीटरचा हा प्रवास आम्ही करू, आमचे श्री राम आमच्याकडून नक्कीच सुरक्षित प्रवास करून घेतील, यात शंका नाही. मारुती जोशी आणि रामकृष्ण यांचा प्रवास हैदराबादजवळील शमशाबाद येथून सुरू झाला असुन. हा प्रवास नऊ दिवसांचा आहे. त्यासाठी दररोज 200 किलोमीटर चा प्रवास करून अयोध्येत दाखल होणार असल्याचे देखील ते म्हणाले.


इतर महत्वाच्या बातम्या