एक्स्प्लोर

वाडिया ट्रस्टसोबत जमत नसेल तर सोडून द्या आणि बाहेर पडा : उच्च न्यायालय

उद्या युनाटेड नेशन्स किंवा अन्य आंतरराष्ट्रीय संस्था अशा कामांत तुमच्या पाठीशी उभ्या राहतील का?, असा सवाल करत जर तुमचाच सहकारी असलेल्या ट्रस्टच्या कारभारावर संशय होता तर वेळीच चौकशी करून छानबिन का केली नाहीत?, असा थेट सवाल केला. कोणत्याही सार्वजनिक संस्थेचं ऑडिट करण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे.

मुंबई : वाडिया ट्रस्टसोबत जमत नसेल तर सोडून द्या. या शब्दांत मुंबई उच्च न्यायालयानं सलग दुस-या दिवशी राज्य सरकार आणि पालिका प्रशासनाचे कान टोचले आहेत. तसेच सार्वजनिक आरोग्य सुविधांसाठी निधी उपलब्ध करताना जर शंका व्यक्त करू लागलात तर उद्या युनाटेड नेशन्स किंवा अन्य आंतरराष्ट्रीय संस्था अशा कामांत तुमच्या पाठीशी उभ्या राहतील का?, असा सवाल करत जर तुमचाच सहकारी असलेल्या ट्रस्टच्या कारभारावर संशय होता तर वेळीच चौकशी करून छानबिन का केली नाहीत?, असा थेट सवाल केला. कोणत्याही सार्वजनिक संस्थेचं ऑडिट करण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. मग तो वेळीच का वापरला नाहीत?, तुमचे राजकिय हेवेदावे हायकोर्टासमोर प्रकरण आल्यावर काढून दाखवणं योग्य नसल्याचं मतही शुक्रवारी हायकोर्टानं बोलून दाखवलं. याबाबत येत्या मंगळवारी हायकोर्ट आपले निर्देश जारी करणार असून तोपर्यंत पालिकेच्या आरोग्य विभागाच्या सह आयुक्तांनी वाडिया रूग्णालयाच्या बोर्डासोबत तातडीची बैठक घेऊन आपल्या ज्या काही शंका असतील त्या दूर करण्याचा प्रयत्न करावा असे तोंडी निर्देश हायकोर्टानं दिले आहेत. स्मारकांची उंची वाढवण्यासाठी राज्य सरकारकडे पैसे आहेत मात्र रूग्णालयाच्या ट्रस्टला देण्यासाठी नाहीत. या शब्दांत गुरूवारी वाडिया हॉस्पिटलसाठीच्या निधीवरून हायकोर्टानं मुंबई महापालिका आणि राज्य सरकारला चांगलंच धारेवर धरलं. ज्याचा परिणाम म्हणून रातोरात पालिकेनं 10 कोटींचा निधी बालकांसाठीच्या विभागात तर उर्वरीत 4 कोटी महिला प्रसुतीवर्गाच्या विभागासाठी असा एकूण 14 कोटींचा तर राज्य सरकारनं 24 कोटींचा निधी ट्रस्टकडे जमा केला खरा, मात्र या दोघांनी वाडिया रूग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. तसेच दोघांनी उर्वरीत जवळपास 100 कोटींचा निधी कागदपत्रांची पडताळणी करून देण्याविषयी निर्णय घेऊ असं हायकोर्टाला कळवलं आहे. मुंबईतील सर्व शासकीय रुग्णालये सुरळीत चालावी म्हणून सरकारतर्फे या रुग्णालयांना निधी देण्यात यावा अशी मागणी करत दिपेश सिसोदिया यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी सरकारच्यावतीने कोर्टाला सांगितले गेले की वाडिया रुग्णालय हे खाजगी रुग्णालय ते साल 1932 मध्ये उभारण्यात आले असून ट्रस्ट मार्फत चालविले जाते. या रुग्णालयावर राज्य सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही. त्यामुळे सरकारमार्फत मिळणारा 50 टक्के निधी थांबविण्यात आला होता, अशी कबूली गेल्या सुनावणीत राज्य सरकारनं दिली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Shivsena UBT: आधी सरनाईकांचा खळबळजनक दावा, मग कळंबचे नगरसेवक तानाजी सावंतांच्या भेटीला, उद्धव ठाकरेंनी कैलास पाटलांसह धाराशिवच्या सर्वांना मातोश्रीवर बोलावलं
आधी सरनाईकांचा खळबळजनक दावा, मग कळंबचे नगरसेवक तानाजी सावंतांच्या भेटीला, उद्धव ठाकरेंनी कैलास पाटलांसह धाराशिवच्या सर्वांना मातोश्रीवर बोलावलं
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Wardha Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Dombivli Crime news: डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
Marathwada Rain Update: मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Embed widget