एक्स्प्लोर

वसंत पंचमीच्या मुहूर्तावर विठ्ठल रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा

वसंतपंचमीच्या मुहूर्तावर आज पंढरपूरात अवघ्या महाराष्ट्राचं आराध्यदैवत असलेल्या विठ्ठल आणि रुक्मिणीचा विवाह सोहळा पार पडला. विवाहाच्या या मंगलप्रसंगी राज्यभरातून अनेक भाविक वऱ्हाडी म्हणून सहभागी झाले होतं.

पंढरपूर : वसंत पंचमीच्या मुहूर्तावर आज पंढरपूरच्या पांडुरंगाचा विवाहसोहळा संपन्न झाला. या आगळ्या वेगळ्या विवाहाची धामधूम सकाळपासूनच मंदिर परिसरात सुरु झाली होती. देवाच्या या विवाह सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी राज्यभरातून हजारो भाविकांनी पंढरपुरात गर्दी केली होती. या विवाह सोहळ्यासाठी पुणे जिल्ह्यातील भाविक भारत भुजबळ यांनी विविध रंगांची ट्रकभर फुले मंदिर सजावटीसाठी आणली होती. भुजबळ यांच्यासोबत आलेल्या पन्नासहून जास्त कारागिरांनी रात्रभर विठ्ठल मंदिर फुलांनी आकर्षकरित्या सजविले होते. विवाह स्थळ असलेला विठ्ठल सभा मंडपाला तर फुलांनी सजवत महालाचे रुप दिले होते. सलग 48 तास आणि 60 कारागिरांच्या मदतीने ही फुलांची सजावट करण्यात आली. या सजावटीसाठी विविध 36 प्रकारच्या दोन टन फुलांचा वापर करण्यात आला आहे. लग्नवधू अर्थात जगत्जननी रुक्मिणीमातेला पांढरी शुभ्र पैठणी नेसविण्यात आली होती. तर नवरदेव विठुरायालादेखील पांढरेशुभ्र कारवतकाठी धोतर, पांढरी अंगी आणि पांढरे मुंडासे परिधान करून सजविण्यात आले होते. आजच्या विवाह सोहळ्यापासून थेट रंगपंचमी पर्यंत देवाला शुभ्र पोशाख करून गुलालाची उधळण करण्याची परंपरा गेली अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे. Pandharpur | वसंतपंचमीच्या मुहूर्तावर पंढरपुरात विठ्ठल आणि रुक्मिणीचा विवाह सोहळा | ABP Majha आज वसंत पंचमी असल्याने श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीवर गुलालाची उधळण करण्यात आली. वसंत पंचमी ते रंगपंचमीपर्यंत देवाला शुभ्र पोशाख करून मूर्तीवर गुलालाची उधळण करण्याची परंपरा गेली अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे. विठ्ठल मंदिरातील सभामंडपाला लग्नस्थळाचे स्वरूप देण्यात आले होते. संपूर्ण सभामंडप फुलांनी सजविण्यात आला होता. विठ्ठल रुक्मिणी स्वयंवराची भगताचार्य अनुराधा शेटे यांचे कथासोहळा ऐकण्यासाठी हजारो महिलांनी येथे गर्दी केली होती. देवाच्या कथासार सांगताच सभामंडपात नवरदेव विठुराया आणि रुक्मिणीमातेला आणण्यात आले. आणि त्यानंतर विवाहसोहळा सुरु झाला. विठ्ठल रुक्मिणीच्या सजवलेल्या उत्सव मूर्तींमध्ये आंतरपाट धरण्यात आला, वऱ्हाडींना अक्षता वाटून मंगलाष्टकाला सुरुवात झाली. शेवटच्या अक्षता पडताच आंतरपाट बाजूला काढून देव आणि मातेला पुष्पहार घालून आरती करण्यात आली. खुद्द परमेश्वराच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी विठ्ठल भक्तांनी मंदिरात अलोट गर्दी केली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9PM TOP Headlines 09 PM 20 January 2025Pankaja Munde on Beed Guardian Minister | बीडचं पालकमंत्रिपद दिलं असतं तर आनंद झाला असता-पंकजा मुंडेZero Hour Jitendra Awhad : धनंजय मुंडेंबाबत जितेंद्र आव्हाडांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 08 PM 20 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Embed widget