एक्स्प्लोर
मुंबई-गोवा महामार्गावर लक्झरी बस पलटली, 27 जण जखमी
खारेपाटणजवळील संभाजीनगर येथे हा अपघात झाला आहे.

सिंधुदुर्ग : मुंबई-गोवा महामार्गावर खारेपाटण येथे लक्झरी बसला अपघात झाला. या अपघातामध्ये 27 जण जखमी झाले आहेत. जखमींवर खारेपाटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करुन त्यांना पुढील उपचारासाठी कणकवलीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
समोरून वेगात येणाऱ्या ट्रकचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला. बस चालकाला ट्रकला चुकवण्याचा योग्य अंदाज न आल्याने विशाल ट्रॅव्हल्सची बस रस्ता सोडून पंधरा फूट खोल जाऊन झाली पलटी झाली.
सकाळी साडे सहाच्या सुमारास हा अपघात झाला. मुंबईहून बांद्याला ही बस जात होती. खारेपाटणजवळील संभाजीनगर येथे हा अपघात झाला आहे. जखमींवर उपचार सुरु आहेत.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
भारत
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement




















