एक्स्प्लोर
गोविंदा सहाव्या थरावरुन पडतानाचा थरार कॅमेऱ्यात कैद
![गोविंदा सहाव्या थरावरुन पडतानाचा थरार कॅमेऱ्यात कैद Video Govinda Injured After Falling From Human Pyramid In Ulhasnagar गोविंदा सहाव्या थरावरुन पडतानाचा थरार कॅमेऱ्यात कैद](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/26193720/Ulhasnagar_Govinda-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये दहीहंडीच्या सहाव्या थरावरुन पडल्याने 13 वर्षीय गोविंदा गंभीर जखमी झाला आहे. गोविंदा कोसळल्याची ही थरारक घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
उल्हासनगरमधील राधेशाम गोविंदा पथकाचा 13 वर्षीय गोविंदा सुजल गडापकर सहाव्या थरारवर चढला होता. त्यावेळी त्याचा तोल गेल्याने तो जमिनीवर कोसळला. या अपघातात त्याच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर कल्याणमधील फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
सहाव्या थरावरुन पडल्याने गोविंदा गंभीर जखमी
मात्र हा गोविंदा कोसळल्याची घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. युवासेनेच्या वतीने आयोजित केलेल्या या हंडीमध्ये कोणतीही सुरक्षा नव्हती. शिवाय अल्पवयीन मुलाचाही समावेश होता. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा अवमान तर केलाच पण एक गोविंदाही गंभीर जखमी झाला आहे. पाहा व्हिडीओअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)