Nagpur: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला. यावेळी नागपुरने  96.52 टक्के निकाल देऊन राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. तर अमरावती विभागाने 96.34 टक्क्यांसह राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. राज्यात 96.52 टक्क्यांसह पहिल्या क्रमांकावर कोकण विभाग आहे.


राज्यासह नागपूरातही मुलींचा निकाल वरचढ लागला असून मुलींचा निकाल 95.35 टक्के तर मुलांची टक्केवारी 93.29 टक्के होती. नागपूर विभागात एकूण एक लाख 60 हजार 28 विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यातील एक लाख 59 हजार 106 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील 1 लाख 53 हजार 584 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून याची टक्केवारी 96.52 इतकी आहे.


सहा जिल्ह्यांमध्ये गोंदिया 'टॉप'वर


औद्योगिक आणि सामाजिक दृष्टीकोणातून मागास समजला जाणारा गोंदिया मात्र बारावीच्या निकालात नागपूर विभागात 97.37 टक्क्यांसह टॉपवर आहे. तर त्यानंतर भंडारा 97.30 टक्के, नागपूर 96.65 टक्के, चंद्रपूर 96.10 टक्के, गडचिरोली 96.00 टक्के तर वर्धा येथील निकाल 95.37 टक्क्यांवर आहे.


कोकण विभाग टॉपवर तर मुंबई सर्वात कमी 


सर्व विभागीय मंडळांमधून नियमित विद्यार्थ्यांमध्ये कोकण विभागाचा सर्वाधिक 97.22 टक्के निकाल असून सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा (90.91 टक्के) आहे. 


विभागनिहाय निकाल


कोकण - 97.22 टक्के 


नागपूर - 96.52 टक्के


अमरावती - 96.34 टक्के 


लातूर -  95. 25 टक्के


कोल्हापूर - 95.07 टक्के


नाशिक - 95.03 टक्के


औरंगाबाद - 94.97 टक्के


पुणे - 93.61 टक्के


मुंबई - 90.91 टक्के


निकालात मुलींचीच बाजी 


बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे.  सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थिनींचा निकाल 95.35 टक्के लागणार आहे तर मुलांचा निकाल 93.29 टक्के लागला आहे. मुलांपेक्षा 2.06 टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.


वाचा


Maharashtra HSC Result 2022 : 12 वी नंतर काय कराल? जाणून घ्या शिक्षणाच्या संधी


निकालानंतर वर्षा गायकवाड म्हणाल्या, परीक्षेच्या काळात काही हितशत्रूंनी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण...


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI