HSC Result 2022 : नुकताच महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यावर्षीही निकालात मुलींनी बाजी मारली आहे. यंदा बारावीचा निकाल 94.22 टक्के लागला आहे. या निकालात मातृभाषा मराठीचा निकाल काय लागला आहे, हे माहित आहे का? महाराष्ट्रात मातृभाषा मराठीमध्ये किती विद्यार्थी पास तर किती विद्यार्थी नापास झाले आहेत? हे जाणून घ्या. यावर्षी बारावीच्या परीक्षेत 8 लाख 45 हजार 343 विद्यार्थी मराठी विषयाच्या परीक्षेला बसले होते. त्यापैकी 8 लाख 29 हजार 773 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. हे प्रमाण 98.16 टक्के इतकं आहे.
यंदाच्या निकालात निकालात कोकण विभाग अव्वल ठरला आहे. तर मुंबईचा निकाल सर्वात कमी लागला आहे. कोकण विभागाचा निकाल 97.21 टक्के तर मुंबईचा निकाल 90.91 टक्के लागला आहे. यंदाही बारावीच्या निकालामध्ये मुलांपेक्षा मुली अग्रेसर आहेत. यावर्षी 95.35 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण 93.29 टक्के आहे. म्हणजे परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा 2.06 टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. गेल्या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे परीक्षा झाल्या नव्हत्या. पण यंदा मात्र कोरोना आटोक्यात असल्यानं दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. त्यानंतर मात्र विद्यार्थी आणि पालकांना निकालाची प्रतीक्षा होती. अखेर ही प्रतिक्षा संपली असून आज दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
निकालाबाबत आक्षेप असल्यास काय करावं?
ज्या विद्यार्थ्यांना निकालाबाबत आक्षेप असेल अशा विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी उत्तरपत्रिका मिळाल्यानंतर पाच कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांच्या अवधित संबंधित विभागाकडे ऑनलाईन अर्ज दाखल करावा लागेल. त्यासाठी प्रतिविषय 300 रुपये भरावे लागतील.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. गेल्या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे परीक्षा झाल्या नव्हत्या. पण यंदा मात्र कोरोना आटोक्यात असल्यानं दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. त्यानंतर मात्र विद्यार्थी आणि पालकांना निकालाची प्रतीक्षा होती. अखेर ही प्रतिक्षा संपली असून आज दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहा निकाल
यंदा तुम्हाला 'ABP Majha' च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI