एक्स्प्लोर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुंचीच पदवी गहाळ
चक्क विद्यापीठाच्या कुलगुरुंचीच पदवी गहाळ झाल्याची तक्रार करण्यात आली आहे.
औरंगाबाद : नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत येणारं औरंगाबादचं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ एका आश्चर्यकारक गोष्टीमुळे चर्चेत आलं आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण चक्क विद्यापीठाच्या कुलगुरुंचीच पदवी गहाळ झाल्याची तक्रार करण्यात आली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. बी. ए. चोपडे यांचं पदवी प्रमाणपत्र गहाळ झालं आहे. बेगमपुरा पोलिसात ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. 22 जानेवारीला पदवी प्रमाणपत्र विद्यापीठ परिसरातून गहाळ झालं.
विविध कारणांमुळे हे विद्यापीठ चर्चेत असतं. मात्र यावेळी जे कारण आहे, ते सर्वांना हैराण करणारं आहे. चक्क विद्यापीठाच्या कुलगुरुंचीच पदवी गहाळ झाली आहे. त्यामुळे आता पोलीसांना ही पदवी शोधण्यात यश येतं का, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement