एक्स्प्लोर
अर्नाळा बीचवर बुडालेल्या 4 मुलांचे मृतदेह सापडले

वसई : वसईच्या अर्नाळा समुद्रात बुडालेल्या चारही विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. रेस्क्यू टीमने स्थानिकांच्या मदतीने हे काम केलं. सनी पालव (वय 15 वर्ष), रोहन जाधव (वय 16 वर्ष), सुजित विश्वकर्मा (वय 16 वर्ष) आणि चेतन कालप (वय 16 वर्ष) अशी मृत विद्यार्थ्यांची नावं आहेत. हे सर्व विद्यार्थी नालासोपाऱ्यातील लक्ष्मीबेन छेडानगरमधील रहिवासी होते. सात विद्यार्थी गुरुवारी पिकनिकसाठी राजोडी समुद्रकिनारी गेले होते. त्यापैकी चौघांना पोहायला येत असल्याने ते खोल पाण्यात उतरले. तर दोन जण किनाऱ्यावरवर पोहत होते. एक जण समुद्राबाहेरच होता. मात्र समुद्राला भरती आल्याने चारही मुलं बुडाली. त्यांचे मृतदेह आज सापडले तर स्थानिकांनी तीन विद्यार्थ्यांना वाचवलं. सचिन रवी मालेकर (वय 16 वर्ष), अंकित उत्तम शर्मा (वय 18) आणि नमा विनोद मिश्रा (वय 18 वर्ष), अशी बचावलेल्या मुलांची नावं आहेत. या मुलांनी किनाऱ्यावर काढलेला सेल्फी शेवटचा ठरला.
Before You Go
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















