एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source:  ECI | ABP NEWS)

Jalgaon News : गायरानप्रश्नी वंचितचा घरावर मोर्चा, गुलाबराव पाटील भररस्त्यात मांडी घालून बसले

Jalgaon News Update : गायरान जमिनीवर अनेक वर्षांपासून नागरिक वास्तव्य करीत आहेत. मात्र, आता शासनाने या गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिल्याने या जमिनीवर वास्तव्य करत असलेले हजारो नागरिक बेघर होणार आहेत.

Jalgaon News Update : गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याच्या कारवाई विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मंत्री गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्यात आला.    न्यायालयाच्या आदेशानुसार शासनाच्या वतीने जळगाव जिल्ह्यात गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवले जात आहे. या कारवाईत जळगाव तालुक्यातील काही घरांचे अतिक्रमण हटविण्याचे काम सुरू आहे. या कारवाईच्या विरोधात  आंदोलक आक्रमक झाले आहेत. हा मोर्चा गुलाबराव पाटील यांच्या निवस्थानी जात असताना जळगावातच मुंबई नागपूर हायवे उड्डाणपूलावर पोलिसांनी अडवला. 

 पोलिस आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत आंदोलनकर्त्यांची काही वेळ खडाजंगी झाली. आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचं लक्षात आल्यानंतर मंत्री गुलाब पाटील यांनी महामार्गावरच बसून आंदोलकांच्या मागण्या समजून घेतल्या. न्यायालयाचे आदेश असल्याने यात आपल्याला काही करता येणे शक्य नाही. मात्र हा विषय आपण सरकार दरबारी मांडून त्यात काही करता येण्यासारखे असेल तर ते करण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी तात्पुरती दोन दिवसांसाठी कारवाई स्थगित करीत असल्याचं आश्वासन आंदोलकांना पाटील यांनी दिले. त्यांतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र, यावेळी पोलिसांची चांगलीच दमछाक झाली.  

पोलिसांनी मोर्चा अडवल्यानंतर आंदोलकांनी महामार्गावरच ठिय्या दिला. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. आंदोलनामुळे वाहतुकीचा खोळंबा होवू नये म्हणून दुसऱ्या बाजूने वाहने वळविण्यात आली होती. यावेळी पोलिसांचाही मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मोठ्या संख्येने यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांसह महिला तसेच नागरिकांची आंदोलनात उपस्थिती होती.

गायरान जमिनीवर अनेक वर्षांपासून नागरिक वास्तव्य करीत आहेत. मात्र, आता शासनाने या गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिल्याने या जमिनीवर वास्तव्य करत असलेले हजारो नागरिक बेघर होणार आहेत. त्यामुळे ही कारवाई थांबविण्यात यावी आणि संबंधित नागरिकांसाठी पर्यायी उपाययोजना करण्यात यावी, या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. 

...तर पुन्हा मोर्चा काढणार
मंत्री गुलाबराव पाटील यांनी तात्पुरती कारवाई थांबवण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, त्यानंतरही पुन्हा कारवाई झाल्यास हिवाळी अधिवेशनात सरकारला जाब विचारण्यात येईल. तसेच हा मोर्चा मुंबईत काढण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी शमीभा पाटील यांनी यावेळी दिला.   

शासकीय दौऱ्यात या मागण्यांबाबत आंदोलकांसोबत चर्चा करण्याबाबत नमूद होते. मात्र त्यानुसार आंदोलकांची भेट झाली नाही आणि आंदोलकांनी थेट मोर्चा काढला. आंदोलकांसोबत चर्चा केली असून या   कारवाईला तूर्तास स्थगिती देण्यात आली असल्याची माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी बोलताना दिली.

महत्वाच्या बातम्या

Pune Railway News : रेल्वेवरील दगडफेक कधी थांबणार? महाराष्ट्र एक्सप्रेसवर दगडफेक; रेल्वेची काच फुटली 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Suraj Chavan: बिग बॉसमध्ये गुलीगत विजय मिळवलेला सुरज चव्हाण सोन्याच्या जेजुरीत; खंडेरायाचं दर्शन घेतलं अन् उधळला भंडारा
बिग बॉसमध्ये गुलीगत विजय मिळवलेला सुरज चव्हाण सोन्याच्या जेजुरीत; खंडेरायाचं दर्शन घेतलं अन् उधळला भंडारा
राजू शेट्टींना लॉटरी, खासदार कोट्यातून मुंबईत म्हाडाचं घर; जाणून घ्या स्वप्नातील घराची किंमत?
राजू शेट्टींना लॉटरी, खासदार कोट्यातून मुंबईत म्हाडाचं घर; जाणून घ्या स्वप्नातील घराची किंमत?
सोलापुरातील पत्रकारांच्या घरांसाठी ७ कोटींचा निधी; पत्रकरांच्यावतीने दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा सन्मान
सोलापुरातील पत्रकारांच्या घरांसाठी ७ कोटींचा निधी; पत्रकरांच्यावतीने दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा सन्मान
मोठी बातमी! अजित पवारच बारामती विधानसभेतून निवडणूक लढणार; प्रफुल पटेल यांची घोषणा, ABPच्या बातमीवर शिक्कामोर्तब
मोठी बातमी! अजित पवारच बारामती विधानसभेतून निवडणूक लढणार; प्रफुल पटेल यांची घोषणा, ABPच्या बातमीवर शिक्कामोर्तब
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 05 PM : 06 October 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सHaryana Election Result : हरियाणात भाजपची  हॅट्रिक! मुंबईत कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोषSupriya Sule on Haryana : हरियाणात भाजपची आघाडी; सुळे म्हणाल्या 4 पर्यंत थांबा ABP MAJHAJammu Kashmir Election : जम्मू-काश्मिरच्या निवडणुकीत फुटीरतावादी नेत्यांना मतदान? खास चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Suraj Chavan: बिग बॉसमध्ये गुलीगत विजय मिळवलेला सुरज चव्हाण सोन्याच्या जेजुरीत; खंडेरायाचं दर्शन घेतलं अन् उधळला भंडारा
बिग बॉसमध्ये गुलीगत विजय मिळवलेला सुरज चव्हाण सोन्याच्या जेजुरीत; खंडेरायाचं दर्शन घेतलं अन् उधळला भंडारा
राजू शेट्टींना लॉटरी, खासदार कोट्यातून मुंबईत म्हाडाचं घर; जाणून घ्या स्वप्नातील घराची किंमत?
राजू शेट्टींना लॉटरी, खासदार कोट्यातून मुंबईत म्हाडाचं घर; जाणून घ्या स्वप्नातील घराची किंमत?
सोलापुरातील पत्रकारांच्या घरांसाठी ७ कोटींचा निधी; पत्रकरांच्यावतीने दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा सन्मान
सोलापुरातील पत्रकारांच्या घरांसाठी ७ कोटींचा निधी; पत्रकरांच्यावतीने दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा सन्मान
मोठी बातमी! अजित पवारच बारामती विधानसभेतून निवडणूक लढणार; प्रफुल पटेल यांची घोषणा, ABPच्या बातमीवर शिक्कामोर्तब
मोठी बातमी! अजित पवारच बारामती विधानसभेतून निवडणूक लढणार; प्रफुल पटेल यांची घोषणा, ABPच्या बातमीवर शिक्कामोर्तब
निवडणूक आयोग एक नंबरचा गुलाम, काय अपेक्षा करणार? हरियाणाचा निकाल येताच ठाकरेंच्या खासदाराचा हल्लाबोल
निवडणूक आयोग एक नंबरचा गुलाम, काय अपेक्षा करणार? हरियाणाचा निकाल येताच ठाकरेंच्या खासदाराचा हल्लाबोल
Haryana Election: काँग्रेसचा शेतकरी, सैनिकांच्या मुद्द्यांवर जोर, विनेश फोगाटने वातावरण तापवलं, तरी भाजपाने कशी मुसंडी मारली? जाणून घ्या 5 महत्त्वाची कारणं
काँग्रेसचा शेतकरी, सैनिकांच्या मुद्द्यांवर जोर, विनेश फोगाटने वातावरण तापवलं, तरी भाजपाने कशी मुसंडी मारली? जाणून घ्या 5 महत्त्वाची कारणं
ठरलं बरका... अजित पवारांना गुलीगत धोका; रामराजेंसह उमेदवारी जाहीर केलेला आमदारही साथ सोडणार
ठरलं बरका... अजित पवारांना गुलीगत धोका; रामराजेंसह उमेदवारी जाहीर केलेला आमदारही साथ सोडणार
Haryana Election Results 2024 : हरियाणात भाजपने मुसंडी मारताच रावसाहेब दानवेंचा 'कॉन्फिडन्स' वाढला; म्हणाले, महाराष्ट्रात...
हरियाणात भाजपने मुसंडी मारताच रावसाहेब दानवेंचा 'कॉन्फिडन्स' वाढला; म्हणाले, महाराष्ट्रात...
Embed widget