मुंबई : वरळी, मुंबई भागात राहणार्‍या वैजयंता आणि रामदास जोशी या दाम्पत्याने समाजसेवेचा अनोखा आदर्श स्थापित केला आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याने प्रेरित होऊन दोन लाख रूपयांची देणगी त्यांनी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटला दिली आहे.


झाले असे की, 'मॅन ऑन मिशन महाराष्ट्र' हे देवेंद्र फडणवीस यांच्यावरील पुस्तक त्यांच्या वाचनात आले आणि त्यात शून्यातून नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युट ही मध्यभारतातील संस्था निर्माण करण्यात त्यांनी दिलेले योगदान याचा सविस्तर उल्लेखही त्यांच्या वाचनात आला. डॉ. आबाजी थत्ते सेवा आणि अनुसंधान संस्थेच्या मार्फत हे कॅन्सर रूग्णालय चालविले जाते. याशिवाय, अलिकडेच देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर येथील भाषण सुद्धा त्यांनी ऐकले, ज्यात कोरोनामुळे पालकत्त्व गमावलेल्या अपत्यांना दत्तक घेण्याचा निर्णय फडणवीस यांनी जाहीर केला होता. जोशी दाम्पत्याने लगेच या उपक्रमाला मदत करण्याची तयारी दर्शविली आणि देवेंद्र फडणवीस यांचा शोध सुरु केला. कुठून तरी त्यांनी भाजपा कार्यालयाचा संपर्क मिळविला आणि तेथून फडणवीस यांच्या कार्यालयाचा. या आणि नागपुरातील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटच्या माध्यमातून होत असलेल्या कामासाठी थोडीथोडकी नव्हे, तर दोन लाख रूपयांची देणगी त्यांनी दिली.


मुंबईच्या वरळी भागात राहणार्‍या सौ. वैजयंता जोशी या 82 वर्षांच्या. मंत्रालयातील शिक्षण विभागातून निवृत्त झालेल्या. त्यांचे पती रामदास जोशी, हे मुंबई महापालिकेतून निवृत्त झालेले, त्यांनी वयाची 89 वर्ष पूर्ण केली आहेत. या मदतीचा धनादेश देण्यासाठी ते या वृद्धापकाळात येऊ शकणार नव्हते. मग व्हिडीओ कॉलवर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्या घरून धनादेश घेण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी घरी बोलावून तो धनादेश दिला. एक प्रेमळ आशिर्वादरूपी पत्रसुद्धा त्यांनी सोबत दिले. 



याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "सामाजिक कार्यासाठी मदत करायला चांगले विचार असावे लागतात. जोशी काका आणि काकूंशी बोलून जे आत्मिक समाधान मिळाले, त्याचे वर्णन मी शब्दात करू शकत नाही. कुणाच्या व्यथा, वेदना जाणून त्यावर प्रेमाची, वात्सल्याची फुंकर घालणारे अनेक लोक आजही समाजात आहेत आणि त्याआधारावरच मानवतेची-मानवधर्माची भिंत अतिशय भक्कम उभी आहे. अशीच एक दातृत्त्वाची अनुभूती मला आली. मी एवढेच म्हणेन की, आपल्यासारख्यांच्याच आशिर्वादावर वाटचाल सुरु आहे. या दोघांचे आभार मानू तरी कोणत्या शब्दांत? अशा दानशूरांच्या बाबतीत संत तुकोबाराय म्हणतात की,


सेवितो हा रस वाटितो आणिका॥
त्यांच्या दातृत्त्वाला सलाम!


महत्त्वाच्या इतर बातम्या :