मराठीचा प्रचार, प्रसार करणाऱ्या मुंबईतील अमेरिकन महावाणिज्यदूतांचा गौरव
मुंबईतील अमेरिकन महावाणिज्यदूत कार्यालयातील प्रतिनिधींनी मागील काही दिवसांत समाज माध्यमांद्वारे विविध उपक्रम राबविले. यामध्ये विकिपीडीयाच्या माध्यमातून मराठी भाषेतून आरोग्यविषयी माहिती प्रसारित केली आहे.

मुंबई : आरोग्य, शिक्षण क्षेत्रात समाज माध्यमांद्वारे विविध उपक्रम राबवून मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करणाऱ्या मुंबईतील अमेरिकन महावाणिज्यदूत कार्यालयामधील प्रतिनिधींचा मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
मुंबईतील अमेरिकन महावाणिज्यदूत कार्यालयातील प्रतिनिधींनी मागील काही दिवसांत समाज माध्यमांद्वारे विविध उपक्रम राबविले. यामध्ये विकिपीडीयाच्या माध्यमातून मराठी भाषेतून आरोग्यविषयी माहिती प्रसारित केली आहे. यासोबत विविध चित्रफिती तयार करून समाज माध्यमांद्वारे प्रदर्शित देखील केल्या आहे. हे करताना मराठी चित्रपटातील लोकप्रिय संवाद स्वत: बोलून त्याच्या संक्षिप्त चित्रफिती तयार केल्या. याच कार्यासाठी आज मुंबईतील अमेरिकी राजदूत जे. रँझ, प्रवक्ते नीक नोव्हाक, वरिष्ठ अधिकारी रोना राठोड यांचा देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

देसाई म्हणले, मराठी भाषेचा आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रचार, प्रसार करण्यासाठी महावाणिज्यदूतमधील प्रतिनिधी करत असलेले काम उल्लेखनीय आहे. दरम्यान, यापुढे अमेरिकेतील मराठी मुलांना महाराष्ट्रातून ऑनलाईन मराठीचे धडे देण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला. याद्वारे रोजगार निर्मितीला चालना मिळेल, असा विश्वास रँझ यांनी व्यक्त केला.
विविधतेत एकता व एकतेतून विविधता हा मुंबई व न्यूयॉर्क या शहरांना जोडणारा दुवा असून ही विविधता आपले सामाजिक जीवन संपन्न करेल आणि विविध संधी निर्माण करेल, असा विश्वास यावेळी उभयंतांनी व्यक्त केला. यावेळी मराठी भाषा विभागाच्या सचिव प्राजक्ता लवांगरे, आंतरराष्ट्रीय परस्पर संबंध तज्ज्ञ अभिषेक सूर्यवंशी उपस्थित होते.
Before You Go
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
महत्त्वाच्या बातम्या






















