बारामती : घरची परिस्थिती बेताची असतानाही जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर बारामतीच्या युवकाने थेट आयपीएस बनवण्याचं आई वडिलांचं स्वप्न खरं करून दाखवलं आहे. बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील अल्ताफ शेख यांनी (शुक्रवारी) जाहीर झालेल्या यूपीएससी परीक्षेत यश संपादन केलं आहे. अल्ताफ यांना परीक्षेत 545 वा क्रमांक प्राप्त केला आहे. शाळेत असताना भजी आणि चहा विक्रीचे कामही अल्ताफ यांनी केलं होतं. त्यांचं प्राथमिक शिक्षण जिल्हापरिषद शाळेमध्ये झालं. त्यानंतर ते पलूस येथील नयोदय विद्यालयालात शिकले. पुढे जाऊन त्यांनी बिटेक करणायचा निर्णय घेतला. अल्ताफ यांनी 2015 साली यूपीएससी परीक्षा पास होऊन केंद्रीय गृह खात्यात डीव्हायएसपी पदावर रुजू झाले होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या पुढाकारातून ग्रामीण भागातील युवकांना स्पर्धा परिक्षांना सामोरे जाण्यासाठी मदत व्हावी या उद्देशानं बारामतीत राष्ट्रवादी करिअर अॅकॅडमी सुरु करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेसाठी पोषक वातावरण उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याच अॅकॅडमीतून शिक्षण घेतलेले आलताफ शेख आज आयपीएस बनले. ही बातमी आल्यानंतर काटेवाडी आणि राष्ट्रवादी करिअर अॅकॅडमीत आनंद व्यक्त करण्यात आला.
आल्ताफ शेख यांच्या जिद्दीची कहाणी युवकांसाठी प्रेरणादायी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परिक्षा देत ते या अगोदर केंद्रीय गृह खात्यात डीवायएसपी बनले होते. इस्लामपूर येथे नवोदय विद्यालयात शिक्षण घेतलेले आलताफ हे विद्यार्थी. पुढे त्यांनी जिद्दीतून फूड टेक्नॉलॉजीतून बी. टेकची पदवी प्राप्त केली. 2013 पासून ते बारामतीत वास्तव्यास आहेत. त्यांनी 2015 ला यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन केंद्रीय गृह दलात कार्यरत आहेत. उत्तर प्रदेशातील सीतापूरमधून नियुक्ती घेतल्यानंतर त्यांची बदली सध्या उस्मानाबाद येथे झाली आहे. सध्या इंटेलिजन्स ऑफिसर म्हणून उस्मानाबाद येथे ते कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील मुलांना स्पर्धा परिक्षांना मदत करण्याच्या उद्देशाने सुनेत्रा पवार यांच्या पुढाकारातून 2012 मध्ये राष्ट्रवादी करिअर अॅकॅडमीची स्थापना केली गेली. आजपर्यंत 47 राजपत्रित अधिकारी या अकादमीतून तयार झाले असून असंख्य युवक युवती सरकारी नोकरीत स्थिरावले आहेत.
यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर
यूपीएससीनं नागरी सेवा 2020 परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला आहे. शुभम कुमार या परीक्षेत अव्वल आला आहे. यूपीएससीच्या निकालानुसार, नागरी सेवा परीक्षेत जागृती अवस्थी आणि अंकिता जैन यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवला आहे. नागरी सेवा परीक्षा 2020 मध्ये 761 उमेदवार उत्तीर्ण झाले असून त्यापैकी 545 पुरुष आणि 216 महिला आहेत. आयएएस अधिकारी आणि 2015 बॅचची टॉपर टीना डाबी यांची बहीण रिया डाबी यांनीही यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. रिया डाबीने 15 वा रँक मिळवली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :