मुंबई : कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत चढ-उतार सुरुच आहे. राज्यात आज  3,723 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 276  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 60  हजार 735  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.24 टक्के आहे. 


राज्यात आज 58 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 9, 416  अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जळगाव (06), नंदूरबार (3),  धुळे (1), जालना (30), परभणी (67), हिंगोली (18), नांदेड (6),   अमरावती (97), अकोला (28), वाशिम (07), बुलढाणा (15), यवतमाळ (05), नागपूर (142),  वर्धा (5), भंडारा (4), गोंदिया (7), चंद्रपूर (77),   गडचिरोली (18 ) या  जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.


राज्यात सध्या 37 हजार 984 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 2,59,120 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1,483  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.  आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 79, 92, 010 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65,41,119 (11.28 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.


मुंबईत गेल्या 24 तासात 454 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद 


मुंबईत गेल्या 24 तासात 454 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 580 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,17,521 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात पाच रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4676 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1195 दिवसांवर गेला आहे. 


गेल्या 24 तासात देशात 29 हजार रुग्णांची भर


भारतात कोरोना रुग्णसंख्येत जरी चढ-उतार दिसत असला तरी सक्रिय रुग्णसंख्येचा आलेख हळूहळू मंदावताना दिसतोय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासात 29,616 रुग्णांची नोंद झालीय तर 290 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासात 28,046 जण कोरोनामुक्त झाले आहेत. एकट्या केरळमध्ये शुक्रवारी 17,983 रुग्णांची नोंद झाली आहे तर 127 लोकांचा मृत्यू झाला.