UPSC Final Result 2020: यूपीएससीने नागरी सेवा 2020 चा अंतिम निकाल जाहीर केला आहे. शुभम कुमार या परीक्षेत अव्वल आला आहे. यूपीएससीच्या निकालानुसार, नागरी सेवा परीक्षेत जागृती अवस्थी आणि अंकिता जैन यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवला आहे. नागरी सेवा परीक्षा 2020 मध्ये 761 उमेदवार उत्तीर्ण झाले असून त्यापैकी 545 पुरुष आणि 216 महिला आहेत. आयएएस अधिकारी आणि 2015 बॅचची टॉपर टीना डाबी यांची बहीण रिया डाबी यांनीही यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. रिया डाबीने 15 वी रँक मिळवली आहे.


जानेवारी 2021 मध्ये लेखी आणि सप्टेंबर-ऑक्टोबर 2021 मुलाखती झाल्या होत्या. यातून



  • 263 जनरल

  • 86 ईडब्ल्यूएस

  • 229 ओबीसी

  • 122 एससी

  • 61 एसटी


असे एकूण 761 जण उत्तीर्ण झाले आहेत. त्यापैकी 180 आयएएस, आयएफएस 36, आयपीएस 200, अ गटातील केंद्रीय प्रशासकीय सेवा 302, ब गटातील प्रशासकीय सेवा 118, 


महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं यश


पुण्यातील अंध विद्यार्थिनी पूजा कदम ही युपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे. तिने यात 577 वी रँक मिळवली आहे.


21 वर्षांची नितिशा जगताप पहिल्याच प्रयत्नात युपीएससी उत्तीर्ण झाली आहे. तेही 199 व्या रँकने.  काल तिचा दिल्लीत मुलाखत झाली आणि आज निकाल लागला. त्यामुळे ती आत्ता दिल्लीतच आहे.  मुळची लातुरची असलेल्या नितिशाने पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण घेतलं आहे.


लातूर येथील निलेश गायकवाड यूपीएससीमध्ये देशात 629 रँकने उत्तीर्ण झाला आहे. गेल्या वर्षी ही निलेशने यूपीएससी परीक्षा दिली होती. त्यावेळी 752 रँक आली होती. तो सध्या संरक्षण सहाय्यक नियंत्रकपदी नियुक्तही झाला होता. सध्या त्याची पुणे येथे ट्रेनिंग सुरु आहे.


सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील शिंदेवाडी येथील शुभम पांडुरंग जाधव याने 445 रँक मिळवणून यश मिळवलं आहे.


कराडच्या तुषार देसाईची युपीएससी परीक्षेत बाजी
कराड तालुक्यातील आणे गावचा तुषार उत्तमराव देसाई याने युपीएससी परीक्षेत बाजी मारली आहे. त्याने 224 वी रँक मिळविली आहे. सध्या तो भोपाळ (मध्य प्रदेश) येथे नाबार्डमध्ये सहाय्यक व्यवस्थापक आहे. तुषार देसाई याचे प्राथमिक, माध्यमिक तसेच बारावीपर्यंतचे शिक्षण शिक्षण कराडमधील यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयात पूर्ण केले. त्यानंतर पुणे येथील एसईओपी कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. नाबार्डमध्ये सहाय्यक व्यवस्थापक म्हणून तो भोपाळमध्ये नोकरीस आहे. या दरम्यान त्याने युपीएससी परीक्षेची तयारी केली होती. 224 वी रँक मिळवून त्याने युपीएससी परीक्षेत यश मिळविले आहे. तुषार याचे वडील उत्तमराव देसाई हे कराडच्या जिल्हा परिषद बांधकाम विभागात शाखा अभियंता आहेत. दोन वर्षापुर्वी तुषारचा मावस भाऊ गिरीश यादव हा देखील युपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. तामिळनाडू केडरमध्ये पोलीस अधीक्षक म्हणून त्याची निवड झाली असून सध्या त्याचे प्रशिक्षण सुरू आहे. 


रँक 137- कमलकिशोर कांदरकर (लातूर)
रँक 138- दर्शन दुगड (यवतमाळ)
रँक 501- अभिजीत वेकोस (जालना-लातूर)


 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI